शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ना खडीकरण, ना सांडपाण्याचे व्यवस्थापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:07 IST

खडीकरणासाठी २२ लाख रुपये मंजूर असतानाही त्या कामास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले. ही व्यथा आहे, प्रभाग १ मधील गिरीजा विहार व रामनगरवासीयांची. सन २००८ पासून या भागात नागरीकरण वाढले; मात्र पायाभूत सुविधांची वानवा असल्याने १० जानेवारीपासून महापालिका परिसरात उपोषणास बसण्याची पूर्वसूचना या रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना दिली.

ठळक मुद्देगिरीजा विहार-रामनगरवासीयांची व्यथा : १० जानेवारीपासून उपोषणाला बसणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खडीकरणासाठी २२ लाख रुपये मंजूर असतानाही त्या कामास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले. ही व्यथा आहे, प्रभाग १ मधील गिरीजा विहार व रामनगरवासीयांची. सन २००८ पासून या भागात नागरीकरण वाढले; मात्र पायाभूत सुविधांची वानवा असल्याने १० जानेवारीपासून महापालिका परिसरात उपोषणास बसण्याची पूर्वसूचना या रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना दिली.दहा वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या गिरीजा विहार-रामनगर भागातील रस्त्यांच्या खडीकरणासाठी सन २०१६ मध्ये १९ लाख ३५ हजार ७२२ रुपये मंजूर करण्यात आले. तत्कालीन नगरसेवक राजू मानकर व स्वाती निस्ताने यांनी ती रक्कम आरक्षित करवून घेतली. नंतर त्या कामाच्या २२.१३ लाख इतक्या वाढीव किमतीला मार्च २०१८ मध्ये मान्यता देण्यात आली. तथापि, नऊ महिने उलटूनही खडीकरणास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ट्रक उलटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या परिसरात २००८ पासून मोठे अपार्टमेंट व घरे झाली. मात्र, नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी परिसरात जमा होते. त्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या, डेंग्यूसदृश आजार निर्माण होत असल्याचे वास्तव आहे.२०११ पासून पाठपुरावागिरीजा विहार व रामनगरवासीयांनी पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी सन २०११ पासून महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार चालविला आहे. ५ मार्च २०११, ९ फेब्रुवारी २०१२, २ एप्रिल २०१४, २ एप्रिल २०१४, ११ एप्रिल २०१५, ३ आॅगस्ट २०१६ ,९ फेब्रुवारी २०१७ व ११ सप्टेंबर २०१८ रोजी निवेदने देण्यात आली. तथापि, प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही समस्या मार्गी लागली नसल्याने त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.कर भरणार नाहीमहापालिकेने आकारलेले विकास शुल्क व प्रत्येक वर्षातील मालमत्ता कराचा नियमित भरणा करण्यात आला. मात्र, तुलनेने सुविधांची वानवा आहे. त्यामुळे महापालिकेचा कर न भरण्याचा निर्णय गिरिजा विहार व रामनगरवासीयांनी घेतला आहे.