आॅनलाईन लोकमतअमरावती : प्राथमिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असतांना कमी पटसंणख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट रचला जात असल्याचा जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला व विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना दिले.कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा.मोफत गणवेश वाटपातील अटी- शर्थी न्यायसंगत नाही, यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासूनच भेदभाव व पक्षपातीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत गणवेश योजनेत समावेश करावा. १९८२ मधील मूळ पेन्शन योजना व भविष्य निर्वाह योजना लागू करावी. सर्व शिक्षकांना एमएससीआयटी अर्हता धारण करण्याची मुदत २०१८ पर्यंत वाढवून द्यावी. शिक्षकांना आॅनलाईनच्या कामातून मुक्त करावे व शाळेत किमान केंद्रस्थळावर डाटा एंट्री आॅपरेटर आणि सर्व सुविधा मिळाव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी अशोक पारडे, गोकूलदास राऊत, जयकुमार कांडलकर, राजेश सावरकर, सदानंद रेवाळे आदी उपस्थित होते.
कोणतीच शाळा बंद करू नये, शिक्षक समिती आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:24 IST
प्राथमिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असतांना कमी पटसंणख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट रचला जात असल्याचा....
कोणतीच शाळा बंद करू नये, शिक्षक समिती आग्रही
ठळक मुद्देविविध मागण्या प्रलंबित : निवासी उपजिजल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर