शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही फोनवर 'नो रिस्पॉन्स'

By admin | Updated: August 10, 2016 23:52 IST

नागपंचमीला प्रथमेशला घरी आणावयाचे होते. आम्ही उत्साहात होतो. शाळा व्यवस्थापनाने संपर्कासाठी तीन क्रमांक दिले होते.

शंकर महाराज आश्रमातील प्रकरण : - तर टळला असता प्रथमेशवरील प्रसंगअमरावती : नागपंचमीला प्रथमेशला घरी आणावयाचे होते. आम्ही उत्साहात होतो. शाळा व्यवस्थापनाने संपर्कासाठी तीन क्रमांक दिले होते. आदल्या सायंकाळी, शनिवारी तिन्ही क्रमांकांवर सतत संपर्क केला. एकही फोन स्वीकारला गेला नाही. 'तुला न्यायला आई आणि आजी येणार आहेत', असा निरोप प्रथमेशला देण्यासाठी फोन केला होता. निरोप देण्यात आला असता तर कपडे बांधून तो तयारीत असता. त्याच्यावर गुदरलेला प्रसंग टळला असता. प्रथमेशच्या गुणांवर आणि वागणुकीवर अभिमान बाळगणारे त्याचे पिता अवधूत सगणे यांनी 'लोकमत'शी बोलताना दाटलेल्या कंठाने मन हलके केले. अवधूत सगणे हे नागपूर येथे प्रथमेश दाखल असलेल्या इस्पितळात आहेत. प्रथमेशच्या आरोग्याची ते हरघडी कामना करीत असतात. जे घडले त्यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. प्रथमेशच्या आई आणि काका-काकूदेखील इस्पितळात आहेत. काय होणार कारवाई?वसतिगृहात विद्यार्थी वास्तव्याला असतील तर त्यांची संपूर्ण जबाबदारी अधीक्षकांची आणि व्यवस्थापनाची ठरते. पिंपळखुटा येथील शंकरमहाराज यांच्या आश्रमाच्या आवारात असलेले 'संत श्री शंकरबाबा समाजकल्याण वसतिगृह' हे शासन अनुदानित आहे. शासनाचे तमाम नियम त्यामुळे व्यवस्थापनाला बंधनकारक आहेत. विद्यार्थ्यांसाठी आलेले निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची सोय उपलब्ध करून देणे, हे वसतिगृह अधीक्षक आणि व्यवस्थापनाचे कर्तव्य ठरते. वसतिगृह हे बंदीगृह नसल्याने आणि शिक्षणाच्या अनुषंगाने केलेली वास्तव्याची अधिकृत सोय असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांशी आणि कुटुंबियांना पाल्यांशी संपर्क साधण्याची उपलब्धी आवश्यक आहे. प्रथमेशच्या वडिलांनी व्यवस्थापनाने दिलेल्या तिन्ही क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही फोन स्वीकारला गेला नाही, हा अधीक्षकांच्या सदोष कार्यपद्धतीचा पुरावा ठरतो. अधीक्षकांवर व्यवस्थापनाची देखरेख असल्यामुळे तेदेखील कायदेशीररित्या जबाबदार ठरतात, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तीन दूरध्वनी क्रमांकांपैकी एक अधीक्षकाचा क्रमांक होता, हे उल्लेखनीय. सणाच्या अदल्या दिवशी, अर्थातच फोन येणे अपेक्षित असतानाच्या कालावधीत पाल्याशी संपर्क न होणे हा मुद्दा व्यवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नव्हती, याकडे अंगुलीनिर्देश करणारा आहे. लहानग्यांच्या वसतिगृहातील या सदोष कार्यपद्धतीची दखल जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी आणि शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्ंयानी घेणे गरजेचे ठरते.ही तर प्रथमेशची बदनामीप्रथमेश टोकाला जाणाऱ्या मानसिकतेचा मुलगा नाही. त्याच्या गळ्यावर तीन वार आहेत. ते खोल आहेत. अन्ननलिकेपर्यंत पोहोचले आहेत. काही मंडळी प्रथमेशने हे वार स्वत:च केल्याची विनाकारण चर्चा घडवून आणत आहेत. आत्मघात करावा, असा माझा मुलगा नाहीच. शंभर नव्हे माझ्या मुलावर माझा हजार टक्के विश्वास आहे. आत्मघाताची कुणी चर्चा घडवून आणत असेल तर माझ्या प्रथमेशच्या बदनामीचाच तो डाव आहे, असे रोखठोक मत त्याच्या वडिलांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी कधी देणार 'शो कॉज'?पिंपळखुटा आश्रमातील संत श्री शंकरबाबा समाजकल्याण वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्याचा गळा ठार मारण्याच्या उद्देशाने कापला गेला. चिमुकल्या प्रथमेशने वैद्यकीय इलाजाला प्रतिसाद दिल्यामुळे तो बचावला; तथापि अनुदानित वसतिगृहात आणि तेदखील धार्मिक आश्रमाच्या आवारात इतका गंभीर प्रकार घडूनही जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतरही संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. कुठल्याही दबावाला बळी न पडता, कर्तव्याला जागून भाऊराव चव्हाण हे वसतिगृह अधीक्षक आणि व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावतात की पाठिशी घालतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.