शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

‘नो पार्किंग’मध्ये वाहने 'जैसे थे'

By admin | Updated: May 27, 2016 00:29 IST

तहसील कार्यालयात नो पार्किंग झोनमध्ये नागरिकच बेशिस्तपणे वाहने लावत आहेत. यावर कुणाचाही अंकुश नाही.

कारवाई केंव्हा ? : तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत वाहनांची रांगसंदीप मानकर अमरावतीतहसील कार्यालयात नो पार्किंग झोनमध्ये नागरिकच बेशिस्तपणे वाहने लावत आहेत. यावर कुणाचाही अंकुश नाही. या वाहनधारकांवर तहसीलदार सुरेश बगळे यांनी कारवाईचा बडगा उगारून ही वाहने बाहेर काढण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा आहे. येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने तहसीलच्या आतील परिसरातच ठेवण्यात येतात. हे तहसील कार्यालय अनेक वर्षांपूर्वीचे आहे. येथे तहसील अधिकृत पार्किंग व्यवस्था करायला हवी. पूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळे त्या लोकसंख्येनुसार, तहसीलचे बांधकाम व परिसराची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता अमरावती तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे येथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते. नागरिक येथे बेवारसपणे कुठेही वाहने उभी करून निघून जातात. त्यामुळे तहसीलदाराच्या व उपविभागीय अधिकारांच्या दालनांपर्यंत वाहनांच्या रांगा अस्ताव्यस्त स्थितीत दिसून येतात. यावरून अशा नागरिकांकरिता नियम आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिताही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असली पाहिजे. परंतु ते नसल्यामुळे तेसुध्दा वाटेल तेथे वाहने ठेवण्याचा प्रताप करतात. त्यामुळे तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जर अशी व्यवस्था असेल तर इतर कार्यलयांचे काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. परंतु तहसीलदार सुरेश बगळे यांनी ही बेशिस्त पार्किंग काढण्यासाठी पुढाकार घेतला तर एका दिवसात ही समस्या निकाली निघू शकते. परिसरात ज्या ठिकाणी वाहने ठेवायचे आहे त्या ठिकाणी अधिकृत दुचाकी पार्किंग झोनचे फलक लावल्यास नागरिक व महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी वाहने ठेवतील. यानंतरही नो पार्किंग झोनमध्ये वाहने ठेवल्यास त्यांच्यावर कारवार्इंचा बडगा उगारायला हवा. तहसीलच्या बाहेरही प्रवेशव्दाराजवळ बेशिस्त वाहने ठेवली जातात त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथे वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा येथे गोंधळाची स्थिती राहणार आहे.