शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

कुणीही नाही राहणार उपाशी;शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; मोफत धान्यामुळे कार्डधारकांना दिलासा

अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटावा याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १९ लाख ४० हजार ५७८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. याबाबत जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्ड धारक

१९४०५७८

प्राधान्यगट- २८५७८२

अंत्योदय -१२१८४४

केसरी ८००२८

बॉक्स

काय मिळणार?

प्रतिमानसी

३ किलो गहू

२ किलो तांदूळ

बीपीएलच्या -२८५७८२

सदस्यांना लाभ

१)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्याना २५ किलो गहू १० किलो तांदूळ अशी एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड

२)प्राधान्यक्रम कुटुंबे योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू ,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रति लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले आहे.

३) केंद्र शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे.याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

केसरीच्या ४०६८५० लाभार्थ्याना मिळणार लाभ

केसरीकार्ड असलेल्यांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता सर्व कार्डधारकांना मोफत धान्य लाभ होणार आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे २०२० च्या अन्नधान्याचे मोफत वाटप करण्याच्या घोषणेनुसार, जिल्ह्यातील सुमारे १९ लाखांवर लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.

- अनिल टाकसाळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी