शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पेट्रोल पंपांवरही आता‘नो मास्क- नो पेट्रोल’,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST

अमरावती : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, संचारबंदी लागू केलेली असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची आता खैर नाही. अशांची वाहने ...

अमरावती : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, संचारबंदी लागू केलेली असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची आता खैर नाही. अशांची वाहने जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. याशिवाय पेट्रोल पंपावरही आता ‘नो मास्क, नाे पेट्रोल’ असे धोरण राबविण्यात येणार आहे. विविध संघटनाही प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पेट्रोल पंपचालक संघटनेशी बैठकीत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेने मास्क नसलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पेट्रोल व डिझेल न देण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व पंपावर त्यासाठी फलकही लावण्यात येतील. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांना पेट्रोल देण्याचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष नरेंद्र मेहता यांनी सांगितले. यावेळी सचिव सौरभ जगताप, सदस्य अखिलेश राठोड आदी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी, फिक्स पॉईंट व पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. शहरात पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यासह विविध पोलीस अधिकारी नाकाबंदी व फिक्स पॉईंटला भेटी देऊन ठिकठिकाणी तपासणी करीत आहेत. हॉटेलमधून पार्सलची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीचा गैरफायदा घेऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करताना काही नागरिक दिसून येत आहेत. स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणे अत्यंत चुकीचे व समाज विघातक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई करण्याचा, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.