शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात हनुमान भक्ताने ओढल्या नऊ बंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:25 IST

जुन्या वस्तीतील बारीपुरास्थित हनुमान मंदिरात ६५ वर्षांपासून बंड्या ओढण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदाही एकट्या हनुमान भक्ताने नऊ बंड्या ओढल्याचे तेथील उपस्थित शेकडो भाविकांनी अनुभवले.

ठळक मुद्दे६५ वर्षांची परंपरा : बघ्यांची मोठी गर्दी, शंभर वर्षांपूर्वीचे प्राचीन हनुमान मंदिर

आॅनलाईन लोकमतबडनेरा : जुन्या वस्तीतील बारीपुरास्थित हनुमान मंदिरात ६५ वर्षांपासून बंड्या ओढण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदाही एकट्या हनुमान भक्ताने नऊ बंड्या ओढल्याचे तेथील उपस्थित शेकडो भाविकांनी अनुभवले. हा क्षण अवलोकणासाठी हनुमान भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.बारीपुरास्थित शंभर वर्षांपूर्वीच्या प्राचीन हनुमान मंदिरात ६५ वर्षांपूर्वी रूपलाल जाट या हनुमान भक्ताने बंड्या ओढण्याची परंपरा सुरू केली होती. तेव्हापासून दरवर्षी बारी पंचायत फंड व हनुमान जयंती उत्सव समिती ही परंपरा आजतागायत जोपास आहे. अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत हनुमान भक्ताने भरलेल्या तसेच एकाला एक बंड्या जुंपून असणाºया नऊ बंड्या एका हनुमान भक्ताने ओढल्या. हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी बडनेरासह परिसरातील हनुमान भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाप्रसादाचा लाभही शेकडो भाविक आनंदाने घेतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाºयांसह कमाण्डोंचा ताफा तैनात करण्यात आला होता. बंड्या ओढण्याच्या कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली.