शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ६९ टक्के पाणीसाठा, दमदार पावसाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:39 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ६८.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

संदीप मानकर अमरावती- पाहिजे तसा दमदार पाऊस पश्चिम विदर्भात कोसळला नसल्याने ३१ जुलैपर्यंत एकही मोठा प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण भरण्याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ६८.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा  १३९९.९१ दलघमी आहे.यामध्ये आजचा उपयुक्त पाणीसाठा ९६२.१७ दघमी असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. त्याची सरासरी टक्केवारी ६८.७३ टक्के होते. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा प्रकल्पात ७७.४३ टक्के पाणी शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ६०.३९ टक्के, अरुणावती सर्वात कमी ३५.३३ टक्के, बेंबळा सर्वाधिक ८६.७६ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ८४.७६ टक्के, वान ४१.६१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ५८.१५ टक्के, पेनटाकळी ५८.३५ टक्के, खडकपूर्णा ७२.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  प्रकल्पानिहाय पर्जन्यमानउर्ध्व वर्धा एकूण पर्जन्यमान ४६५.० मीमी झाले. पुस प्रकल्प २७२.० मीमी, अरुणावती २७०.० मीमी, बेंबळा ३४१.० मीमी, काटेपूर्णा ३७१.० मीमी, वान ५१३.० मीमी, नळगंगा २०५.० मीमी, पेनटाकळी ४१७.०मीमी, खडकपूर्णा २९६.० मीमी पावसाची नोंद झाली आहे. 

२५ मध्यम प्रकल्पांत ६० टक्के पाणीसाठापश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ६०.५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४७७ लघु प्रकल्पांत सरासरी ४९.८२ टक्के पाणीसाठा आहे. मोठे, लघु व मध्यम असे एकूण ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ६०.२७ टक्के पाणीसाठा हा ३१ जुलै पर्यंतच्या आवाहलानुसार शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, वाशीम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे, हे विशेष!