शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नवजाताला कृत्रिम श्वासोच्छवासाने जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 22:25 IST

अतिदुर्गम भागात नवजाताला कृत्रिम श्वासोच्छवासाने जीवनदान देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित मोबाईल मेडिकल युनिट मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा पुरवित आहे.

ठळक मुद्देठोके झाले होते कमी : मोबाईल मेडिकल युनिटची यशस्वी कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अतिदुर्गम भागात नवजाताला कृत्रिम श्वासोच्छवासाने जीवनदान देण्यात आले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित मोबाईल मेडिकल युनिट मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा पुरवित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, धूळघाट रेल्वेच्या अंतर्गत गोलाई (ता. धारणी) या गावात मोबाईल मेडिकल युनिटची चमू ९ जुलै रोजी वैद्यकीय सेवा देण्याकरिता पोहोचली असता, तेथील गर्भवती माता मसुरी मुकेश डुडवा (२०) हिला दुपारचे वेळी अचानक असह्य प्रसूतिवेदना होऊ लागल्या. रुग्णांची स्थिती लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा झोड यांनी अथक परिश्रम घेऊन गर्भवती मातेची यशस्वी प्रसूती केली व गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे जन्माचे वेळी २ किलो ४०० ग्रॅम इतके वजन होते. मसुरी या गर्भवती महिलेला भेट दिली असता, महिलेची पहिलीच प्रसुती आहे व पोटात बाळाचे ठोके कमी होत आहेत, असे निदर्शनास आले. मातेची धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्याने मातेला प्रसूतीसाठी घेतले. प्रसूतीदरम्यान बाळाने पोटात संडास केली होती. बाळ जन्माला आल्यानंतर रडले नाही. मातेची व बाळाची परिस्थिती अतिशय जोखमीची असताना घाबरून न जाता वैद्यकीय अधिकाºयांनी तब्बल ३५ मिनिटे बाळाला कृत्रिम श्वसन दिले. अखेर बाळाचे श्वसन चालू होऊन मूल रडले. यावेळी परिचारिका रंजना ढेबले यांनी मोलाची कामगिरी बजावली.मोबाइल मेडिकल युनिट पथकाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा नामदेव झोड, परिचारिका रंजना ढेवले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्रिवेणी, फार्मासिस्ट योगेश मुंडे, वाहन चालक राजू शिरसकर व विठ्ठल गायकवाड या सर्वांचे सहकार्य लाभले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी वैद्यकीय चमूचे यशस्वी अभिनंदन केले आहे.