शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:46 IST

परतवाडा -अचलपूरसह परिसरात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यात विजाही कडाडल्या. सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजताच्या दरम्यान या पावसाच्या सरी कोसळ्यात काल बुधवारला ही याच वेळेत परतवाड्यात पावसाने हजेरी लावली होती.

ठळक मुद्देनागरिकांची तारांबळ : परतवाडा बाजार समितीत धान्य भिजले

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : परतवाडा -अचलपूरसह परिसरात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यात विजाही कडाडल्या. सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजताच्या दरम्यान या पावसाच्या सरी कोसळ्यात काल बुधवारला ही याच वेळेत परतवाड्यात पावसाने हजेरी लावली होती.गुरुवार आठवडी बाजाराचा दिवस. आठवडी बाजाराला मेळघाटसह ग्रामीण भागातील लोकांचीही परतवाड्यात चांगलीच वर्दळ असते. या वर्दळीतच वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बाजारातील दुकानदारांची आणि लोकांची एकच तारांबळ उडाली. तर कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणलेले हजारो पोते उघड्यावर राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत ओले झाले. वादळामुळे अमरावती व अंजनगाव, अकोला मार्गावर झाड उन्मळून पडलेत. काही ठिकाणी फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही मोठा फटका बसला.शेतकºयांच्या मालाकरिता टीन शेड उभारले आहेत. पण टिनशेडमध्ये आणि आॅक्शन हॉलमध्ये व्यापाºयांचे धान्य अडत्यांनी भरून ठेवले आहेत. शेतकऱ्यांचा माल ते उघड्यावर ठेवतात. व्यापाºयांनी आपला वेअर हाऊसमध्ये ठेवायला हवे होते. पण तेथे भाडे मोजावे लागत असल्याने व्यापाºयांचा माल टिन शेडमध्ये व आॅक्शन हॉल शेतकºयांसाठी राखीव असताना अडत्यांनी तेथे ठेवला आहे. यात शेतकºयांचा माल ओला झाला आहे. यात लाखो रुपयांच्या मालाची नासाडी झाली आहे.याकडे डीडीआर आणि डीएमओंनी लक्ष घाण्याची गरज निर्माण झाली असून, हे अधिकारी नेमकी कोणती पावले उचलतात याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.नवनीत राणांच्या आभार रॅलीलाही फटका : खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार माणण्याकरिता खासदार नवनीत राणा यांची आभार रॅली परतवाडा-अचलपूर मध्ये सायंकाळी ४ वाजता आयोजित होती. पण त्या पोहचू न शकल्यामुळे सात वाजेपर्यंत ही या आभार रॅलीला सुरुवात झालेली नव्हती.भूगाव जवळ झाडे कोसळली : परतवाडा - अमरावती रस्त्यावरील भूगाव मेघनाथपूर दरम्यान मोठमोठी झाडे उन्मळून कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या रस्त्याने धावणाºया एका शिवशाही बसवर झाडाच्या फांद्या कोसळल्या. मोठा अपघात टळला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे ही घटना घडली.ओले झालेले पोते व्यापाऱ्यांचे आहेत. शेतकºयांचे नाहीत. कुठल्याही शेतकºयांची तक्रार आमच्याकडे नाही.- पी.बी. सारवे, सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर

टॅग्स :Rainपाऊस