शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

दुष्काळाच्या निश्चितीला बगल, उपाययोजनांची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:41 IST

खरिपामध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १,९६३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याला शासनाने बगल दिला.

ठळक मुद्देआठ प्रकारच्या सुविधा : ५० पेक्षा कमी पैसेवारीच्या १६६३ गावांना लाभ

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : खरिपामध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १,९६३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याला शासनाने बगल दिला. यापैकी बहुतांश गावांमध्ये दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू करण्यात आला असतानाही शासनाने पुन्हा शब्दच्छल केला. या सर्व गावांत दुष्काळस्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे आठ प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. याविषयीच्या सूचना महसूल विभागाने २८ फेब्रुवारीला जाहीर केल्या.जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३४ टक्के पाऊस कमी पडला. १२० पैकी ४५ दिवस पावसाचे राहिलेत. त्यामुळे अल्प कालावधीची मूग, उडीद, सोयाबीनसारखी पिके बाद झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १९६३ गावांमध्ये खरिपाची अंतिम ४६ पैसेवारी जाहीर करण्यात आली. दुष्काळ जाहीर करण्याची कार्यपद्धती ७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या दुष्काळ देखरेख समितीद्वारा या विषयीचा अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला. यामध्ये जलनिर्देशांकाच्या आधारे बहुतांश गावांत दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू करण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी यंत्रणेलाच समितीच्या कार्यकक्षा माहीत नसल्यामुळे याचा बोजवारा उडाला. गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुके वगळता मध्यम स्वरूपाचा दुष्काळ विदर्भात जाहीर करण्यात आलेला नाही. शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद् आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक या आधारे दुष्काळाचे मूल्यमापन करून उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले असले तरी जिल्ह्यात उपाययोजना समितीने सुचविल्या नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यात या सवलती लागूजमीन महसुलात सूटसहकारी कर्जाचे पुनर्गठणशेतीकर्ज वसुलीस स्थगितीकृषिपंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के सूटशाळा, महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफरोहयो कामाच्या निकषात सुधारणापाणीपुरवठ्यासाठी टँकरकृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणेसुविधा मिळणाऱ्या गावांची तालुकानिहाय संख्याजिल्ह्यातील १,९६३ गावांमध्ये खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ आहे यामध्ये अमरावती तालुक्यात १३९, भातकुली १३७, तिवसा ९५, चांदूररेल्वे ९०, धामणगाव रेल्वे ११२, नांदगाव खंडेश्वर १६१, मोर्शी १५६, वरूड १४०, अचलपूर १८४,चांदुरबाजार १७०, दर्यापूर १५०, अंजनगाव सुर्जी १२७, धारणी १५२, चिखलदरा तालुक्यात १५० गावांचा समावेश आहे.