अमरावती : येथील वडाळी वन विभागाच्या कार्यालयात वन परिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन झाले.
वनपाल, वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते.
-------------------------
जेल मार्गावरील रस्ते दुरूस्तीला प्रारंभ
अमरावती : येथील जेल मार्गावर गत काही महिन्यांपासून खड्डे पडले हाेते. मात्र, रस्ते
निर्मितीकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांची ओरड होती. अखेर नागरिकांच्या मागणीनंतर रस्ते दुरूस्तीला सुरूवात झाली आहे.
-----------------------
वनमजुरांचे बेमुदत उपोषण बेदखल
अमरावती: येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गत आठवड्यापासूच बारमाही वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. अमोल इंगळे, मनोज वानखडे, प्रवीण गाढवे, प्रशांत वाकोडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी सीसीएफकडे केली आहे.
------------------------------
महापालिका आधार केंद्रात प्रजासत्ताक दिन (फोटो आहे)
अमरावती : महापालिकेच्या बडनेरा येथील आधार शहरी बेघर केंद्रात ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बेघर असलेल्या बांधवांना मिठाई, फराळाचे वाटप झाले.
राजीव बसवनाथे यांनी मार्गदर्शन केले. कोरोना काळातही या केंद्रात भरीव कामगिरी केली.
----------------------------------
अपर आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिन
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयात प्रजासत्तक दिन साजरा करण्यात आला. अपर आयुक्त विनोद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त नितीन तायडे, लेखापाल प्रवीण इंगळे आदी उपस्थित होते.