अमरावती : येथील राजापेठ परिसरात भुयारी गटारची कामे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांची वाहतूक उड्डाणपुलावरून होत आहे. उड्डाणपूल अरुंद असल्याने वाहनांची कोंडी होत आहे. बऱ्याचदा वाहनांची गर्दी लवकरच दूर होत नसल्यामुळे वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
-------------------
प्रजासत्ताकदिनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन (फोटो घेणे)
अमरावती : आमदार सुलभा खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधनाच्या प्रास्ताविकेचे वाचन झाले. यावेळी आ. सुलभा खोडके, संजय खाेडके, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगाेले, किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, प्रशांत डवरे, ममता आवारे, रतन डेंडुले, राजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.
----------------------
अकोला महामार्गावर खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त
अमरावती : अकोला मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे. लोणी ते बडेनरा दरम्यान खड्ड्यामुळे वाहन चालकांना अपघाताची शक्यता बळावली आहे. बांधकामा विभागाने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
--------------------------
वरुडा गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष
अमरावती : महापालिका हद्दीतील वरुडा गावात विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. महापालिका हद्दीतील हे दक्षिणेकडील शेवटचे गाव आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने विकासकामे झाली नाहीत. रस्ते, नाल्याची समस्या कायम आहे. अंतर्गत रस्त्यांची दैना झाली आहे.
----------------------------