अमरावती: येथील इतवारा बाजारात उड्डाणपूल निर्मितीची कामे वेगाने सुरू आहेत. अशातच रस्त्यालगत हातगाड्यांची गर्दी होत असल्याने नागरिकांना पायी चालणे कठीण होते. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग शाेधणे दुरापास्त झाले आहे. इतवारा बाजारात वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.
------------
ॲकेडमिक स्कूलच्या प्रागंणात कचरा समस्या
अमरावती : वलगाव मार्गावरील ॲकडमिक स्कूलच्या प्रागंणात कचरा समस्या ही नियमित बाब झाली आहे. आजूबाजूकडील रहिवासी, दुकानदार येथेज कचरा आणून टाकतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास विलंब होत असल्याने कचरा तुंबून राहतो. त्यामुळे शाळा परिससरात दुर्गंधी पसरत आहे.
------------------
पठाण चौकात अतिक्रमण वाढले
अमरावती: स्थानिक पठाण चौकात अतिक्रमणाची समस्या कायम आहे. रस्त्यालगत हातगाड्या, पानठेले, चहा टपरी थाटण्यात आल्यामुळे पायी चालणाऱ्यांना मार्ग शोधणे कठीण झाले आहे. पठाण चौकातील अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष चालिवले आहे.
--------
नवीन वळण मार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक
अमरावती : शहराबाहेरून गेलेल्या नवीन द्रुतगती महामार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतूक ही नित्याची बाब झाली आहे. विशेषत: वडाळीकडे जाणाऱ्या मार्गावर ही डोकेदुखी आहे. दुचाकी चालक या मार्गावर विरुद्ध दिशेने वाहने नेतात. त्यामुळे भरधाव ट्रक, मालवाहू वाहनांचे नियंत्रण सुटते. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे
--------------------
रेल्वे स्थानक चौकात रस्ते निर्मितीला वेग
अमरावती : येथील रेल्वे स्थानक चौकात सिमेंट रस्ते निर्मितीला वेग आला आहे. विकासकामे सुरू असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. काही वेळा रेल्वे स्थानक चौकात वाहतूककोंडी ही नियमित समस्या झाली आहे. रस्ते निर्मितीची कामे वेगाने करावी, अशी मागणी आहे.