शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त महापालिका आयुक्तांचे ‘ऑन द स्पॉट’ इन्स्पेक्शन!

By प्रदीप भाकरे | Updated: July 3, 2024 17:57 IST

पाहणी : विभागप्रमुखांशी केली चर्चा, मनपा शाळांना आकस्मिक भेट

प्रदीप भाकरे अमरावती : नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी ३ जुलै रोजी राजापेठस्थित मध्य झोन कार्यालय, तेथीलच मालमत्ता कर विभाग, एनयुएलएमविभाग, पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर व बाजार परवाना विभागाची पाहणी केली. उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, उपअभियंता प्रमोद इंगोले उपस्थित होते.  कलंत्रे यांनी २ जुलै रोजीच महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर बुधवारी त्यांनी प्रशासकीय व्यवस्था जाणून घेतली. कलंत्रे यांच्या नियुक्तीमुळे अमरावती महापालिकेला एन. नविन सोना यांच्यानंतर आयएएस आयुक्त मिळाले आहेत. सोना हे १० जून २०१० ते ३१ ऑगस्ट २०१२ पर्यंत येथे कार्यरत होते हे विशेष.              

यावेळी आयुक्तांनी चारही कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यालयाची रचना व विभागांची व्यवस्था जाणून घेतली. विविध विभागप्रमुखांची व अधिका-यांची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्थेची पाहणी करत त्यांनी माहिती जाणून घेतली. मनपा झोन क्र.२ व ३ येथे नागरिकांकरीता मालमत्ता कर भरण्यासाठी संगणकीकृत नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी नवीन मालमत्ता कर भरण्याकरिता झोन कार्यालयात आबालवृद्ध व महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. झोनच्या कर्मचा-यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन नागरिकांना सहकार्य केले जात असल्याचे निरिक्षण कलंत्रे यांनी नोंदविले. सोबतच, ३ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास आयुक्तांनी मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ११ व मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक १३ दस्तूर नगर येथे आकस्मिक भेट दिली.

महानगरपालिकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारची सेवा दिली जाते. मालमत्ता कर वसुली करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्मार्ट पॉस मशिनद्वारे अधिकाधिक मालमत्ता कर वसुली करावी. मालमत्ता कराबाबत झोनस्तरावर व विविध परिसरात जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत.सचिन कलंत्रे, महापालिका आयुक्त 

टॅग्स :Amravatiअमरावती