शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचा केंद्राकडे नव्याने १,२१८ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:11 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) कडे पाठविला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडे सादर अ‍ॅकेडमिक एक्सलन्स अ‍ॅन्ड प्लॅनिंग समितीने तयार केला प्रस्ताव

आॅनलाईन लोकमतअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) कडे पाठविला आहे. अ‍ॅकेडमिक एक्सलन्स अ‍ॅन्ड प्लॅनिंग समितीने हा डीपीआर तयार केला, हे विशेष.रूसाने राज्यातील सर्व विद्यापीठांना संस्था विकास योजनेंतर्गत डीपीआर मागविले होते. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने हा डीपीआर अतिशय कमी अवधीत तयार करण्याची किमया केली आहे. पुढील १० वर्षांत विद्यापीठाला काय अपेक्षित आहे, याचा वेध घेऊन समितीने डीपीआर तयार केला असून, शैक्षणिक, भौतिक, वसतिगृहे, वाचनालये, संशोधनासाठी पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्य अशा सर्वंकष बाबीचा यात समावेश करण्यात आला आहे. नव्या डीपीआरमध्ये विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी रूसा प्रयत्नशील आहे.राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषदेने (नॅक) ठरवून दिलेल्या मापदंडानुसार विद्यापीठाने नवा डीपीआर तयार केला आहे. यात शैक्षणिक, मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना, विस्तार, पायाभूत सुविधा, शैक्षणिक संसाधने, विद्यार्थी आधार, प्रगती, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन तसेच संस्थात्मक मूल्य विकासाचा समावेश आहे. नव्याने तयार केलेला डीपीआर रूसाकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मान्यता मिळताच विद्यापीठाचा झपाट्याने विकास करता येईल, असे संकेत आहेत.या समितीने तयार केला डीपीआरकुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने डीपीआर तयार केला आहे. यात प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, माजी कुलगुरू विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, ओमनवार, व्ही.एस. चौबे, राजेश सिंह, एस.एफ.आर. खादरी, मनीषा काळे व विद्यापीठ विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे यांचा समावेश आहे.तीन टप्प्यांमध्ये विभागला प्रस्तावयोजना संख्या आवश्यक निधीलहान (शॉर्ट टर्म) ४४ १०३ कोटी ४४ लाख ३० हजारमध्यम (मीडियम टर्म) १३१ ६०० कोटी ४६ लाख ६८ हजारमोठे (लाँग टर्म) ५३ ५१४ कोटी २२ लाख २४ हजारभविष्याचा वेध घेत नव्याने डीपीआर तयार केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक बाबीच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थिकेंद्रित डीपीआर असल्याने रूसा या प्रस्तावाला नक्कीच मान्यता देईल. हा प्रस्ताव मान्य झाल्यास अमरावती विद्यापीठ जागतिक पातळी गाठेल, यात दुमत नाही.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :educationशैक्षणिकuniversityविद्यापीठ