शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर नवीन लष्करी अळीचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा या परोपजिवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजिवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करावेत.

ठळक मुद्देएकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे : विभागीय कृषी सहसंचालकांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह विभागातील कपाशीवर नवीन लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. यासाठी केंद्र शासनाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती सुचविलेली आहे. याचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.शेतात नियमितपणे निरीक्षणे आणि देखरेख करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरित वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरून, अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. कीडीचे वेळेत व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा या परोपजिवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजिवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करावेत. प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. मुख्य शेत तणविरहीत ठेवणे, तसेच आजूबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे.कीटकनाशक नोंदणी समितीने मंजूर केलेल्या शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत कीटकनाशकांचा वापर करावा. कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे कापूस पिकांवर मेटाºहायझियम अ‍ॅनिसोप्ली किंवा नोमेरिया रिलाई या कीडरोगजनक बुरशीचा ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे महत्त्वाचे आहे.असे करा व्यवस्थापननागपूर स्थित केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शिफारशीनुसार प्रादुभावग्रस्त कापूस पिकांचे पुढील नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यावर स्पिनेटोरम ११.७ टक्के एस.सी., ०८ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस.सी., ०.३ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोक्टीन ५ टक्के एसजी ०.४ ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९ टक्के ईसी १.१६ मिली या कीटकनाशकांची प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.८० पिकांवर कीडींची उपजिविकानवीन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) या किडीचे मका हे मुख्य खाद्य असले तरीही ते पीक शेतातून काढून टाकल्यास किंवा ते पीक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यास त्यांची पसंती कमी होऊन या कीडीचा कपाशी, बाजरी व इतर पर्यायी पिकांवर प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. ही कीड सुमारे ८० पिकांवर उपजिविका करीत असल्याने खरिपातील मका पीक काढल्यानंतर ती आजूबाजूच्या इतर पिकांवर स्थलांतरित होऊ शकते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी