शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात पीएच.डी.चे नवीन चारशे गाइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:40 IST

संकेत स्थळावर यादी प्रसिद्ध : संशोधन केंद्रावर २० मार्चपर्यंत प्रवेश घेण्याच्या सूचना 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सोमवारी पीएच.डी.चे नवे ४०० गाइड घोषित केले आहेत. या गाइडची यादी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २० मार्चपर्यंत संशोधन केंद्रात पीएच.डी.करिता प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

           केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने नव्या अध्यादेशाद्वारे कुलगुरूंना अधिकार बहाल केले असून, त्यानुसार अधिसूचना जारी केली आहे. विद्यापीठ अंतर्गत १०३ संशोधन केंद्रे निर्माण करण्यात आली असून, ४० केंद्रे नव्याने निर्माण होतील, अशी तयारी चालविली आहे. २० मार्चपर्यत पीएच.डी. प्रवेश झाल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित केला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अध्यादेशानुसार केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कोर्सवर्क सुरू करता येणार आहे. 

यूजीसीची मान्यता असलेल्या विद्यापीठातून एम.फिल. पदवीधारकांना पीएच.डी. कोर्सवर्कमधून सूट देण्याचा निर्णय झाला आहे.  नव्या निकषात चार फॅकल्टी असतील. संशोधन केंद्रावर प्रवेश घ्यावा लागणार आहे. तेथेच प्रवेश प्रक्रिया व  शुल्काचा भरणा होईल. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारांची कोर्सवर्क शुल्क घेऊन प्रवेश निश्चित केला जाणार आहे. संशोधन केंद्राला निवड यादी १० दिवसांत विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे. त्यानंतर विद्यापीठाचे नामांकन शुल्क आणि अर्ज भरून ते २५ एप्रिलपर्यंत संशोधन केंद्रांना विद्यापीठात पाठवावे लागणार आहे. पीएच.डी पदवीसंदर्भात नव्या अध्यादेशाने कुलगुरूंना अधिकार बहाल केले आहेत.        १ डिसेंबरपर्यंत चालणार पीएच.डी. प्रवेश  पहिल्या टप्प्यात २० मार्चपर्यंत पीएच.डी. प्रवेश देण्याबाबतची तयारी विद्यापीठाने चालविली आहे. त्यानंतर दुसºया टप्प्यात नव्याने ३१ मे रोजी गाइडची यादी जाहीर केली जाणार आहे. यावेळी इच्छुकांना १ डिसेंबर २०१९ पर्यंत संशोधन केंद्रावर पीएच.डी.करिता विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, असे विद्यापीठ पीएच.डी. सेलने कळविले आहे.         

‘‘ नव्या अध्यादेशानुसार पीएचडी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २० मार्चपर्यंत मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांवर अर्ज सादर करावे लागतील. त्यानंतर ३१ मे रोजी संशोधकांची यादी प्रसिद्ध होणार असून, १ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रवेश घेता येईल.   - सुजय बंड, उपकुलसचिव, पीएच.डी. सेल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती