शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

नवीन नोंदणीत स्त्री मतदारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत मतदार नोंदणीच्या विशेष ड्राईव्हमध्ये १ जानेवारीपर्यंत ३१ हजार ४६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली.

जिल्ह्यात २२ लाख ५९ मतदार : ६,१५९ मतदारांना यादीमधून वगळलेअमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत मतदार नोंदणीच्या विशेष ड्राईव्हमध्ये १ जानेवारीपर्यंत ३१ हजार ४६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या २२ लाख ५९ हजार २६४ एवढी झालेली आहे. नवीन मतदार नोंदणीमध्ये जिल्ह्यात ३१ हजार ४६१ अर्जांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये १५ हजार १३७ पुरुष व १६ हजार ३२४ स्त्री मतदार आहेत. यासाठी ३१ हजार ४७९ अर्ज दाखल होते. या नोंदणीमध्ये ५ हजार ६१० आक्षेप नोंदविण्यात आलेत. यामध्ये ५ हजार ५०१ आक्षेप निकाली काढण्यात आलेत. यामध्ये २ हजार ९५९ पुरुष व २ हजार ५४२ स्त्री मतदार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२ लाख ५९ हजार २६४ मतदारांमध्ये ११ लाख ७६ हजार २८३ पुरुष व १० लाख ८२ हजार ९८१ स्त्री मतदार आहेत. मतदारसंघनिहाय धामणगाव विधानसभा मतदारसंघात १ लाख ४५ हजार ७५७, बडनेरा १ लाख ५७ हजार २४२, अमरावती १ लाख ४३ हजार ३३९, तिवसा १ लाख ३४ हजार ५४५, दर्यापूर १ लाख ३२ हजार ४३१, मेळघाट १ लाख २२ हजार ३३७, अचलपूर १ लाख १९ हजार ६१३ व मोर्शी मतदारसंघात १ लाख २७ हजार ७१७ मतदार आहेत.प्रारूप मतदार यादीत २२ लाख ३३ हजार ९७८ मतदार आहेत. यामध्ये ११ लाख ६४ हजार ४३० पुरूष व १० लाख ६९ हजार ५३२ स्त्री मतदार आहेत. यामध्ये मागील मतदार यादीत २५ हजार ३०२ मतदारांची वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)नवीन नोंदणीमध्ये स्त्री मतदारांची संख्या अधिकमतदार नोंदणीच्या विशेष अभियानात जिल्ह्यात ३१ हजार ४६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री मतदार अधिक आहे. १६ हजार ३२४ स्त्री मतदार व १५ हजार १३७ पुरूष मतदार आहे. सर्वाधिक ३७०० स्त्री मतदारांची नोंदणी अमरावती मतदारसंघात झालेली आहे.