शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बदलाने विदर्भातील 19 बाजार समित्यांची निवडणूक, 10 आर शेती असणा-या शेतक-यांना मताधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 18:47 IST

आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

- गजानन मोहोडअमरावती : आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ३० जून २०१८ पर्यंत मुदत संपणा-या राज्यातील ५३ बाजार समित्या निवडणुकीस पात्र आहेत. यापैकी १९ बाजार समित्या विदर्भातील आहेत. या सर्व ठिकाणी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.नव्या सुधारणेनंतर प्रथमच निवडणुका होणा-या बाजार समित्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल, हिंगणा, कळमेश्वर, रामटेक, नरखेड, नागपूर व कामठी यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा, दारव्हा, बोरी, पुसद, उमरखेड व दारव्हा, चंदपूर जिल्ह्यात पोंभुर्णा, गडचिरोली, गोंदिया तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा. मलकापूर व सिंदखेडराजा या बाजार समित्यांचा समावेश आहे.शेतकरी मतदारसंघासाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान यादीमध्ये १५ समान गण विभाजन करण्यात येणार आहे. यापैकी पाच गण आरक्षित राहणार आहे. यामध्ये दोन महिलांसाठी एक अनुसूचित जाती व एक अनु. जमातीसाठी व एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राहील. आणि एक जागा विमुक्त भटक्या जमातीसाठी राहणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव जागा लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. मतदार यादीतील नावे शेतक-यांच्या वर्णमालेनुसार राहील. यामध्ये पुणे बाजार समितीची निवडणूक विशेष चर्चिली जात आहे.या बाजार समितीचा कार्यकाळ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपुष्टात आला. परंतु मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र, ८ आॅगस्ट २०१७ ला निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविल्याने आता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणद्वारा निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.यादीची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडे- जी व्यक्ती १० आर शेतजमीन धारण करीत आहे व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे, अशा शेतकरी मतदारसंघाची गावनिहाय प्राथमिक यादी संबंधित बाजार समितीच्या सचिवाला व जिल्हा निवडणूक अधिका-याला बाजार समितीचा कार्यकाळ संपण्याच्या किमान १८० दिवस आधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांची आहे.- ज्या शेतक-यांनी मागील पाच वर्षांमध्ये शेतमाल किमान तीन वेळा विक्री केला त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात येतील. संबंधित बाजार समितीच्या क्षेत्रात राहणा-या शेतक-याचे वय निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशी २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आदी उमेदवारीचे निकष आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती