शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

११५ वर्षांनंतर नवी इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी तसेच संगणक कक्षासह गोपनीय विभागाचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देचांदूर बाजार पोलीस ठाणे : गुरुवारी कामकाजाला प्रारंभ, ९० आर क्षेत्रात सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : चांदूरबाजार पोलीस ठाण्याच्या इंग्रज अदमानीतील इमारतीत सुरू असलेले कामकाज तब्बल ११५ वर्षांनी नव्या इमारतीत स्थानांतरित झाले आहे. १ कोटी ३२ लाख रुपयाची ही नवीन पोलीस स्टेशन ची इमारत उभारण्यात आली आहे. गुरुवारी नव्या इमारतीत पोलिसांचे कामकाज सुरू झाले.तालुक्यात शंभर वर्षांपूर्वीची शासकीय कार्यालयाची एकमेव इमारत स्थानिक पोलीस ठाण्याची होती. १९०५ साली जुन्या इमारतीत कामकाज सुरू करण्यात आले. या इमारतीला ११५ वर्षांचा इतिहास लाभला. अनेक पावसाळे-उन्हाळे या इमारतीने सोसले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या इमारतीत पाणीगळती तसेच शिकस्त झालेल्या भिंतीचे पोपडे पडण्याच्या घटना घडल्या. जीर्ण पोलीस कोठडीसुद्धा धोकादायक असल्याचे पाहणीतून समोर आले होते. या गोष्टीची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (मुंबई) यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी दोन वर्षांपूर्वी मंजूर करून घेतला होता.चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी तसेच संगणक कक्षासह गोपनीय विभागाचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. हे सर्व बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता नीलेश चौधरी व मिलिंद भेंडे यांच्या देखरेखीत झाले. इमारतीचे काम पूर्ण होऊन बराच कालावधी झाला.जुन्या इमारतीत पावसाळ्यात सगळीकडून पाणी गळत होते. यामुळे गुरुवारी या नवीन इमारतीत औपचारिक स्थानांतर सोहळा पार पडले. ठाणेदार उदयसिंग साळुंके यांनी नवीन इमारतीचे पूजन करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक वळवी, जयश परीवाले, राजू म्हरसकोल्हे, शंकरलाल कास्देकर, राजपाल नाकाडे, भूषण पेठे, विनोद इंगळे, वीरेंद्र अमृतकर, निकेश नशीबकर, महिला पोलीस कर्मचारी नीता खुणे, योजना जितसह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे