शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ेअस्ताव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:28 IST

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री जयस्तंभ चौक ते जवाहर गेट मार्गावर पायी गस्त घालून अस्तव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी केली.

ठळक मुद्देकारवाईचे निर्देश : सीपींचा जयस्तंभ चौक ते जवाहर गेट फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री जयस्तंभ चौक ते जवाहर गेट मार्गावर पायी गस्त घालून अस्तव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी केली. पुन्हा अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास व्यापाºयावर सक्त कारवाई करा, असे सक्त निर्देश सीपींनी कोतवालीच्या ठाणेदारांना दिले आहेत.शहरातील मुख्य बाजारपेठेत सद्यस्थितीत वर्दळ वाढली आहे. सण उत्सवाच्या पर्वामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी येत आहेत. अशाप्रसंगी व्यापारी प्रतिष्ठानांसमोरील पार्किंग व्यवस्थेचा बोजबारा उडाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सीपींनी रात्री जयस्तंभ चौकापासून पायी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना जवाहर गेटकडे जाणाºया मार्गावरील व्यापारी प्रतिष्ठानांसमोर अस्तव्यस्थ स्थितीत वाहने पार्क केली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ठाणेदार मनीष ठाकरे यांना नो-पार्किंग झोनमध्ये येणाºया वाहनांवर कारवाई करण्यास निर्देश दिलेत. काही व्यापाºयांना बोलावून त्यांना पार्कींगसंदर्भात शिस्त राखण्याचे सक्त निर्देश दिलेत. पुन्हा पार्किंगमधील वाहने अस्तव्यस्त स्थितीत आढळली, तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी व्यापाºयांना दिला. पायी गस्तीदरम्यान अनेक व्यापाºयांची साहित्य प्रतिष्ठानांबाहेर ठेवल्याचेही सीपींच्या लक्षात आले. मुख्य मार्गावरच अनेकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या अनधिकृत पार्किंगविषयी सतर्क राहून कारवाई करा, असा इशारा सीपींनी ठाणेदारांना दिला.गस्तीदरम्यान पोलिसांनी जयस्तंभ चौकातील एका हॉटेलसमोरून विनाक्रमाकांच्या चार दुचाकी व चार सायकल 'डिटेन' केल्या आहेत. तसेच काही नागरिकांनी रस्त्यावरच दुकान थाटल्याचे आणि ते सर्व साहित्य गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्याचप्रमाणे प्रभात टॉकीजजवळ सुरु असणाºया बांधकामस्थळी रस्त्यावरच गिट्टी व रेती आणून टाकल्याचे सीपींच्या निदर्शनास आले. यासंदर्भात कारवाईचे अधिकार महापालिका प्रशासनाला असताना पोलिसांनीच वाहतुकीच्या दृष्टीने गिट्टी व रेती हटविण्यास संबंधित इमारत मालकास सांगितले.शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. अशाप्रसंगी व्यापारी प्रतिष्ठानासमोरील रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासंबंधाने व्यापाºयांना शिस्तीत वाहने लावण्याचे निर्देश दिले आहे.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त