शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड ...

आसेगाव पूर्णा : राज्य सरकारने दोन वेळा वेगवेगळ्या योजनांतर्गत दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, तर कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. मात्र, दोन वर्षे पूर्ण होत आली तरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे.

कोरोणाच्या संकटसमयी शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसमोर गारपीट, अतिवृष्टी, नापिकी अशी विविध संकटे समोर आलेली असतानाही या शेतकऱ्यांनी उसनवारी करीत, घरातील दागिने विक्री करून डोक्यावर कर्ज नको म्हणून बँकेचे कर्ज फेडले. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे आवश्यक होते. मात्र, त्यांची दखल शासन घ्यायला तयार नाही. आजही या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचालकांनी मशागतीच्या कामाचे वाढविलेले दर यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत. नियमितपणे कर्जाची परतफेड करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. आगामी हंगाम पाहता शेतकऱ्यांची आर्थिक अडचण टाळण्यासाठी नियमित फेड करणाऱ्या कर्जदाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

***********

इंडियन बँकेच्या आसेगाव पूर्णा शाखेतून १५-२० वर्षांपासून पीक कर्जाची नियमित उचल व भरणा करीत आहे. दोन वर्षे पूर्ण होत आले तरी अद्यापही माझ्या खात्यावर कोणत्याही योजनेतील रक्कम परतफेडीनंतर जमा झाली नाही. शासनाने कोरोनासारख्या महामारीत खचलेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देऊन आता तरी मदत करावी.

- अजय तायडे, शेतकरी, टाकरखेडा पूर्णा

-------------

शासनाने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शासनाकडून पन्नास हजार रुपये दिले. मात्र, अद्यापही माझ्या खात्यावर ते जमा झालेले नाही. मी उलाढाल करून व दागदागिने गहाण ठेवून बँकेतील कर्जाची परतफेड केली. मात्र, शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला.

- अंबादास पाटील, शेतकरी, आसेगाव पूर्णा