शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तावर उपचार करणाऱ्या धामणगावच्या ‘त्या’ डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 20:08 IST

धामणगाव रेल्वे (अमरावती) : आठवडाभरापूर्वी अमरावती येथील एका इसमाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्या इसमाची तपासणी करणा-या डॉक्टरचा ...

धामणगाव रेल्वे (अमरावती) : आठवडाभरापूर्वी अमरावती येथील एका इसमाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्या इसमाची तपासणी करणा-या डॉक्टरचा कोरोनासंबंधी चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. मात्र, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरीच राहण्याची गरज आहे.अमरावती शहरातील हाथीपुरा भागातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यापूर्वी त्याने अमरावती येथील दोन खासगी डॉक्टरकडे उपचार घेतला होता. ज्या डॉक्टरने सर्वात आधी त्या कोरोनाबाधित इसमाची तपासणी केली होती, ते डॉक्टर धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. संबंधित डॉक्टरांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतले होते. दरम्यान संबंधित डॉक्टरने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात १ ते ३ एप्रिलदरम्यान तीन दिवस बाह्यरुग्णांची तपासणी केली होती. त्यामुळे त्यांच्या थ्रोट स्वॅबच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तो निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात ‘घरीच राहा व सुरक्षित राहा, असे आवाहन तहसीलदार भगवान कांबळे यांनी केले आहे. 

संबंधित डॉक्टरचा कोरोनासंबंधीचा तपासणी अहवाल गुरुवार ९ एप्रिल रोजी प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आला आहे.- महेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या