शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोंड अळीची भरपाई, घोषणा नको कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:19 IST

यंदा बीटी कपाशीवरील बोंड अळीने धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक नुकसान झाले. या दशकात कृषी क्षेत्रातील मोठे संकट शेतकऱ्यांवर उदभवले आहे.

ठळक मुद्दे‘एनडीआरएफ’ची मदत : दशकातील सर्वात मोठ्या संकटाने शेतकरी हादरला

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा बीटी कपाशीवरील बोंड अळीने धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक नुकसान झाले. या दशकात कृषी क्षेत्रातील मोठे संकट शेतकऱ्यांवर उदभवले आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील कपाशी या बोंड अळीने उद्ध्वस्त झाली असताना केंद्र शासनाची मदत देण्याचे सुतोवाच शासनाने केले. ही केवळ अधिवेशनापूर्वीची घोषणा न ठरता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्राच्या १०७ टक्के म्हणजेच दोन लाख सहा हजार २७६ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. कपाशी पात्या फुलांवर असताना बोंडअळी व रसशोषक किडीमुळे लाल्याचा मोठ्या प्रमाणावर अटॅक झाला, यामध्ये किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशीचे ६० ते ७० टक्कयावर नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी तर बोंड अळीमुळे ९६ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले. बोंड अळीची प्रतिरोध क्षमता वाढल्यानेच बीटीे तंत्रज्ञान गेल्या दोन वर्षांपासून अपयशी ठरले आहे. यंदा तर सार्वत्रिक ६० ते ७० टक्के नुकसान झाले असल्याने शेतकºयांचा खरीप हंगामच वाया गेला. शेतकरी कपाशीच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवीत असताना बोंडअळीच्या नुकसानीसाठी नैसगीक आपत्तीमधून मदत देणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.मात्र ही मदत कश्या प्रकारची राहणार हे शासनाने स्पष्ट केलेले नाही.केंद्राच्या मर्जीवरच राहणार भिस्तकृषी आयुक्तालयाकडून जिल्हा कृषी कार्यालयांना २८ नोव्हेंबरच्या पत्रानुसार बीटी बोंड अळीचे नुकसान हे ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’च्या निकषात आहे. ३ जानेवारी २०१२ च्या परिपत्रकानुसार कीड व रोगांचे नुकसान पातळी ही ५० टक्क्यांवर असल्यास शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळू शकते. मात्र, या मदतीसाठी केंद्र शासनाच्या मदतीवरच राज्य शासनाला निर्भर राहावे लागणार असल्याने शेतकरी साशंंकच आहे.बोंड अळीच्या नुकसानीसंदर्भात प्राप्त तक्रारींची क्षेत्रिय अधिकाºयांद्वारा पाहणी करून प्रपत्र भरण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधून आता भरपाई मिळू शकते. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.- सुभाष नागरे, कृषी सहसंचालक