शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर विश्र्वश्र्वरैया यांचे विचार काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 21:59 IST

भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्र्वश्र्वरैया यांनी अभियंता म्हणून जे काम आपल्या आयुष्यात केले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अभियंता दिनी सी.बी. पाटील यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्र्वश्र्वरैया यांनी अभियंता म्हणून जे काम आपल्या आयुष्यात केले. ते सर्व अभियंत्याना प्रेरणादायी आहेत. त्याचे विचार अभियंता म्हणून काम करतांना नवी दिशा देणार असून ते सर्वानी अंगीकारण्याची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन पतंप्रधान ग्राम सडक योजना विभागाचे अधिक्षक अभियंता सी.बी. पाटील यांनी केले. ते शुक्रवारी जिल्हा परिषद अभियंता संघटना व मित्र परीवाराच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित अभियंता दिनाचे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सीईओ के.एम. अहमद होते.कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे,संजय येवले, के.टी. उमाळकर,विशाल जवंजाळ,अरविंद गावंडे,संजय व्यवहारे,प्रमोद तलवारेआदी उपस्थित होते. पुढे बोलतांना पाटील म्हणालेत.अभियंत्याचे दैवत मोक्षगुंडम सर विश्र्वश्र्वरैया यांच्या कार्याची प्रेरणा सदैव जागृत राहण्याचे दुष्टीने दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य लक्षात घेता. सर विश्र्वश्र्वरैया यांनी आपल्या जिवनात अभियंता म्हणून काम करतांना सलग १०२ वर्षाच्या सेवा काळात अभियंता, कुशल प्रशासक व सेवानिवृत्तीनंतर मार्गदर्शक म्हणून जे काम केले. ते नक्कीच अभियंत्याना प्रशासनात काम करतांना उपयोगी ठरणार आहे. त्याच्या विचारा ठेवा लक्षा घेवून तसेच काम केले तर कुठेही अभियंता मागे पडणार नाही. पारदर्शक व जनतेसोबत संवाद ठेवून अभियंत्यानी जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी उमाळक,व्यवहारे आदीनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्राचे प्रास्तावीक अभियंता अनुप खासबागे,यांनी तर सुत्रसंचालन दिपेंद्र कोराटे,दिलीप कदम व आभार प्रदर्शन अभियंता संदीप देशमुख यांनी केले.यावेळी अभियंता संघटनेने विविध कार्यक्रमही आयोजित केले होते. कार्यक्रमाला, आनंद दासवत, प्रदीप पोकळे, आर.आर पवार, शिरीष तट्टे,डोंगरे, तायवाडे, व सर्व अभियंता उपस्थित होते.या अभियंत्याचा गौरवजिल्हा परिषद अभियंता संघटना व मित्रपरिवारा तर्फे के.टी उमाळकर, एस.आर लळे,भगवंत ईश्र्वरकर, हरीभाऊ लुंगे, दिलीप पाटील, भगवान खाजोने, भरत पोकळे, जी.आर. किचबंरे, शेखर भुताड या सेवा निवृत्त अभियंत्यासह पदोन्नती प्राप्त दिपेंद्र कोराटे, अजय गुप्ता, ललित सोनोने, आर.एस मांगे, मिलींद भेंडे, संजय घाणेकर, राजाभाऊ जगताप, सुरेश वानखडे, नंदा पिपळकर, राजेश लाहोेरे, आदीचा सह रक्तदान करणाºया सर्व अभियंत्याचा शाल स्मूतीचिन्ह देवून मान्यवरांचे हस्ते गौरव केला.