शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लिंबू पिकाची क्षेत्रवाढ गरजेची

By admin | Updated: September 15, 2015 00:10 IST

सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे.

कृषी विभागाने घ्यावा पुढाकार : जिल्ह्यात केवळ २६७ हेक्टर क्षेत्रलोकमत विशेषअमरावती : सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे. इतर फळपिकांपेक्षा कमी पाणी व मध्यम प्रकारच्या जमिनीतही हे पीक सहज घेता येते. वातावरणातील बदल व कीडरोगामुळे अन्य फळपिकांच्या सरासरी उत्पादनात घट येत असताना लिंबूने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. लिंबूच्या क्षेत्रवाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास ही स्थिती कायम राहणार आहे. दररोजच्या जेवणात लिंबू हा अविभाज्य घटक आहे, सौंदर्यप्रसाधनांसाठी लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिंबांपासून लोणचे व विविध खाद्यपदार्थ बनतात, उन्हाळ्यात तर लिंबाला जोरदार मागणी असते. मात्र, त्या तुलनेत जिल्ह्यात लिंबांची उत्पादकता कमी असल्याने लिंबाची भाववाढ व टंचाई असते. लिंबू हे बारमाही पीक असल्याने अन्य पिकांच्या तुलनेत लिंबूचे उत्पादन मात्र हमखास होते. जिल्ह्यातील सर्व प्रकारची जमीन ही लिंबूवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात लिंबू लागवडीसाठी योजना असताना जिल्ह्यातील क्षेत्रवाढ झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत २६७.५६ हेक्टरमध्ये लिंबूची लागवड आहे. २४०७.५ मेट्रिक टन उत्पादकता आहे. तालुकानिहाय क्षेत्र पाहता अमरावती तालुक्यात १४.२५ हेक्टर, भातकुली ८.५३ हेक्टर, चांदूररेल्वे १२.१० हेक्टर, धामणगाव ८.३८, नांदगाव खंडेश्वर ८३.९६ हेक्टर, मोर्शी २६.४१ हेक्टर, वरूड ६.५५ हेक्टर, तिवसा ३५.०३ हेक्टर, चांदूरबाजार ३.२४ हेक्टर, अचलपूर २ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५८.२१ हेक्टर, चिखलदरा ४० आर, धारणी ४.५० हेक्टर क्षेत्र आहे. या पिकाची क्षेत्रवाढ झाल्यास प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)लिंबू या फळपिकाचे तीन बहर घेता येतात. उन्हाळ्याच्या सोयीने बहराचे नियोजन केल्यास अधिक भाव मिळतो, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो.- योगेश इंगळे,कृषी शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र.