अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मेघना मडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 04:11 PM2019-12-30T16:11:48+5:302019-12-30T16:12:12+5:30

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मोहन मडघे थेट जनतेतून निवडून आल्या आहेत.

NCP's Meghna Madhage is the city president of Morsi in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मेघना मडघे

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मेघना मडघे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मोहन मडघे थेट जनतेतून निवडून आल्या आहे. त्यांच्यापूर्वी नगराध्यक्ष असलेल्या शीला रोडे यांच्या आकस्मिक निधनाने ही निवडणूक पार पडली. रिंगणात असलेल्या पाच उमेदवारांपैकी मेघना मडघे यांच्या पारड्यात एकूण १६,३४३ पैकी १०८२० मतदान पडले. भाजपच्या अश्विनी सुशील वानखडे यांन ३४७७, काँग्रेसच्या स्वाती मिलिंद पन्नासे यांना १६२३ मते प्राप्त झाली. अपक्ष उमेदवार सुनील धोंडू कुमरे यांना १३४, तर पूनम असलमशहा यांना १३२ मते मिळाली. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी व मुस्लिम जनसमुदायाने त्यांच्या विजयाचा जल्लोष केला. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांनी या विजयासाठी परिश्रम घेतले.

Web Title: NCP's Meghna Madhage is the city president of Morsi in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.