शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसवर नियंत्रणासाठी राष्ट्रवादीची ‘समिती’

By admin | Updated: April 24, 2016 00:34 IST

जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत धुसफूस : राष्ट्रवादीने केली समन्वय समितीची अनौपचारिक घोषणाप्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे. काँग्रेसच्या असहकार्याने त्रस्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेतील अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी नुकतीच बैठक बोलविली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यात काँग्रेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनौपचारिक समिती तयार केली आहे. समितीच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, सत्तेला एक वर्षाचा कालावधी लोटत नाही, तोच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विकास काम तथा जिल्ह्याच्या नियोजनात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून न घेता एकहाती सत्ता असल्याच्या अविर्भावात काम सुरू केले. त्यामुळे सत्तेत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समानतेची वागणूक न देता अविश्वासाचे राजकारण करीत असल्याने मागील काही दिवसांपासून दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत धूसफुस सुरू आहे.विकासकामांचे वाटप करताना दुय्यम वागणूक मिळत असल्याने अर्थसंकल्पीय सभा तथा या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहिर्गमन करून काँग्रेसला धारेवर धरले होते. यावरूनच त्यांच्यात अंतर्गत कलह असल्याचे दिसून आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा असंतोष दूर करण्यासाठी काँग्रेसने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘बुंद से गयी, वह हौद से नही आती’ या उक्तीनुसार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा प्रस्ताव धूळकावला. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा असे होणार नाही, असे अभिवचन दिले. मात्र, काँग्रेसकडून पुन्हा डावलण्याचे षडयंत्र होऊ शकते, असे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, बाहेरून पाठिंबा देणारे शिवसेनेसह अन्य तीन सदस्य अशा १९ सदस्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला. यावेळी काँग्रेसकडून पुन्हा विकासकामे असो किंवा अन्य कुठलेही कामे असो त्यात आपल्याला डावलणार नाहीत याची खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अनौपचारीक समिती बनविली आहे. ही समिती काँग्रेसच्या पदाधिऱ्यांच्या हालचालिंवर नजर ठेऊन कामांचे समसमान नियोजन व्हावे, यादृष्टिने प्रयत्न करणार आहे. काँग्रसवर नियंत्रणासाठी समिती तयार केली असली तरी, काँग्रेसचे पदाधिकारी त्यांना कितपत सहकार्य करतात, हे येणारा काळच सांगेल.