शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

नवतपाचा उकाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:25 IST

सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे.

ठळक मुद्देअंगाची लाही-लाहीपारा ४५ अंशांवर

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनुभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.तुर्तास धारणीचा पारा ४४ ते ४५ अंशावर पोहचला आहे. या तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे च्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद पार केली. नवतपातील पहिल्या रविवारी रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यपासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत. सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, जायचेच असेल तर तोंड सुती कपड्याने बांधून घ्यावे, सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, गॉगल घालावा, चप्पल न वापरता बुट वापरण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. धारणी तालुक्याचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावेश असताना चिखलदºया तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने मेळघाटचे पर्याावरण असंतुलित झाले आहे.काय आहे नवतपा?नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत. नवतपा सुरू झाल्यापासून अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी धारणीत कमाल ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.