शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आजपासून नवरात्रौत्सव, गरब्यावर खाकीचा वॉच! दामिनी पथके वाढविली

By प्रदीप भाकरे | Updated: October 2, 2024 13:42 IST

Amravati : सोशल मीडिया पोस्टवरही सुक्ष्म नजर, सीपी ऑन रोड

प्रदीप भाकरे

अमरावती : गुरूवार ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून, शहरात ४९२ ठिकाणी दुर्गादेवी व १०२ ठिकाणी शारदादेवीची स्थापना केली जाणार आहे. यादरम्यान १२ ऑक्टोबरपर्यंत शहरात ६४ ठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यातील सर्वाधिक २२ ठिकाणे ही राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. नवरात्रोत्सवावर शहर पोलिसांची करडी नजर असताना विशेषकरून गरबा कार्यक्रमावर खाकीचा करडा वॉच राहणार आहे. त्यासाठी पोलीस ठाणेनिहाय विशेष पथकासह दामिनी पथकेही वाढविण्यात आली आहेत. गरब्यावर सहा दामिनी पथकांचा वॉच राहणार आहे.

नवरात्र उत्सवात स्थापना व विसर्जन मिरवणूक व शोभायात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरीता पोलीस आयुक्तालयातर्फे असामाजिक तत्वाकडून कोणताही उपद्रव होणार नाही याकरीता, दुखापतीचे गुन्हे, मारामारी, छेडखानीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत सर्व ठाणेदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. नवरात्रौत्सवासाठी १०३ पोलीस अधिकारी व १३५० अंमलदार तैनात असतिल. शहरातील महत्वाचे चौक, गर्दीचे ठिकाणे, मिश्र व संवेदनशिल वस्तीच्या ठिकाणी फिक्स पॉईंटस लावण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता १२ सी आर मोबाईल, सहा दामिनी पथके, बीट मार्शल व डायल ११२ वी वाहने शहरात सतत गस्त करीत राहणार आहे. सोशल मिडियावरील पोस्टवर देखील सायबर पोलिसांचे २४ बाय ७ लक्ष असणार आहे.

ठाणे :          दुर्गादेवी            शारदादेवी              गरबा

राजापेठ :          ५९                     ०५                     २२कोतवाली :        २३                     ००                     ०७

खो. गेट :           ५९                     ०९                      ०९भातकुली :         १९                     २४                       ००

गाडगेनगर :       ८०                    ०६                       ०६वलगाव :           ३१                     २०                        ००

नागपुरी गेट:       २६                    ०२                       ००नांदगाव पेठ        ४०                   १२                        ०२

फ्रेजरपुरा:           ७५                   १८                        १२बडनेरा:               ८०                  ०६                        ०६

एकुण :               ४९२                 १०२                      ६४"शहरातील नवरात्रौत्सव सुरळीत व सुरक्षित होणेकरीता सर्व शासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेली कामे करण्याकरीता पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची दक्षता घेण्याची सुचना करण्यात आली आहे. गरबा कार्यक्रमावर विशेष लक्ष असणार आहे."- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४AmravatiअमरावतीPoliceपोलिस