अमरावती : नागरी वस्तीत २४ तासांत नऊ कोब्रा आढळून आलेत. या विषारी नागांना वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.सर्पमित्र गणेश अकर्ते, निखिल फुटाणे, प्रतीक औतकर, मुकेश वाघमारे यांनी शहरातील कांतानगर, राहटगाव परिसरातून, ठकसेन इंगोले यांनी मंगलधाम कॉलनी आणि गजानननगर येथून, भूषण सायंके यांनी उत्तमसरा गावातून प्रत्येकी एक कोब्रा नागरी वस्तीतून पकडला. अक्षय चांबटकर, अभिजित दाणी, प्रतीक ढगे, आकाश डोळे यांच्या चमूने स्वस्तिक दालमील व अंजनगाव बारी येथून तीन कोब्रा पकडले.वसा रेस्क्यू हेल्पलाइनलोकवस्तीत साप वा इतर वन्यजीव आढळल्यास वनविभागाला १९२६ किंवा वसा रेस्क्यू हेल्पलाईन ९९७०३५२५२३, ९५९५३६०७५६ क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन शुभम सायंके आणि निखिल फुटाणे यांनी केले आहे.रात्रीही रेस्क्यू आॅपरेशनसाप आढळल्याचे रात्री उशिरादेखील नागरिक हेल्पलाइनवर कळवतात. त्यावेळीही आम्ही साप पकडतो आणि संस्थेकडे नोंद करून त्वरित त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी करतो, अशी माहिती अक्षय चांबटकर यांनी दिली.नाग काढले विहिरीबाहेरशहरानजीकच्या अंजनगाव बारी येथील येवतीकर यांच्या शेतातील विहिरीत दोन कोब्रा अनेक दिवसांपासून पडल्याची माहिती सर्पमित्र वैभव फरांदे यांना मिळाली. त्यांना शिताफीने बाहेर काढले.वन्यजीवाला हानी पोहोचल्यास शिक्षाअनेक वन्यजीव सावली, तात्पुरता निवारा, अन्न तसेच पाण्याच्या शोधात शहराच्या आसपास आहेत. पुरेशा माहितीअभावी वा भीतीपोटी त्यांचे प्राण घेतले जाऊ शकतात. कोणत्याही वन्यजिवाला हानी, जखम, हुसकून लावणे किंवा ठार मारल्यास वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि सुधारणा कायदा २००२ नुसार शिक्षा व आर्थिक भुर्दंड पडू शकतो.
शहरात २४ तासांत नऊ कोब्रा नागांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:41 IST