सर्वोत्कृष्ट महाविद्यालय : तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीअमरावती : प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारतीय तंत्रशिक्षण संस्था, आयएसटीई नवी दिल्ली यांचा अखिल भारतीय स्तरावरचा भारतीय विद्याभवन पुरस्कार जाहीर झाला. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबाबत हा पुरस्कार देण्यात येतो. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून अध्यक्ष नितीन धांडे यांनी ही माहिती देताना गेल्या ३२ वर्षांपासून तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात आमचे महाविद्यालय भरीव कामगिरी करीत आहे. शैक्षणिक सेवा, पायाभूत सुविधा, विविधांगी कामगिरीकरिता इंडियन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्युकेशन दिल्ली या ठिकाणच्या संघटनेकडून प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारतीय विद्याभवन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार महाविद्यालयाला ९ जानेवारी रोजी भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या ४५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात मिळणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तंत्रशिक्षण परिषदेचे अनिल सहस्त्रबुद्धे, प्रताप देसाई प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. दरवर्षी असा पुरस्कार वितरित होत असतो. महाविद्यालयाची कामगिरी तपासणारे २४ निकष या पुरस्कारासाठी तपासण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला संस्थेचे विनय गोहाड, पंकज देशमुख, युवराजसिंग चौधरी आदी उपस्थित होते.
मेघे अभियांत्रिकीला राष्ट्रीय पुरस्कार
By admin | Updated: January 8, 2016 00:09 IST