शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

अपात्र सदस्यांचे नाव फलकावर

By admin | Updated: April 5, 2015 00:29 IST

तालुक्यातील शिंदी (बु.) ग्रामपंचायतीच्या सदस्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करीत विकासकामांचा कंत्राट स्वत:च्या मुलाला दिल्यामुळे ...

पदाचा दुरुपयोग : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामपंचायतीची केराची टोपलीअचलपूर : तालुक्यातील शिंदी (बु.) ग्रामपंचायतीच्या सदस्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करीत विकासकामांचा कंत्राट स्वत:च्या मुलाला दिल्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सदस्याचे सदस्यत्व अपात्र घोषित केले आहे. शिंदी ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा कंत्राट स्वत:च्या मुलाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लाभ मिळवून दिल्याप्रकरणी अमरावती अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने शेख इस्माईल शेख बहाद्दर यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र केले. या घटनेला दहा दिवस झालीत तरीही कार्यकारिणी फलकावर अपात्र सदस्याचे नाव कायमच असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.शिंदी (बु.) येथे ग्रामपंचायत सदस्य शेख इस्माईल हे सन २०१० मध्ये निवडून आले होते. त्यांनी ग्रा. पं. अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांत मुलगा शेख तनवीर शेख इस्माईल यास सदर विकासकामे मिळवून देण्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेऊन मुलाला कंत्राट मिळतील याची तजविज केली. त्यामध्ये जनसुविधा स्मशान रोड, दलितवस्ती सुधार योजना, १३ वित्त आयोगाची विकास कामे तसेच जि. प. व पं. स. स्तरावरील विकासकामे मुलाला मिळवून दिली.यावर सदस्य शेख इस्माईल शेख बहाद्दर यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वैयक्तिक लाभ घेतल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांच्या न्यायालयात सय्यद कलिमुल्ला व राहुल गाठे यांनी सदस्य शेख ईस्माईल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या याचिकेवर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली असता आरोप सिद्ध झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाअन्वये याचिकाकर्ते यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर करून शेख इस्माईल शेख बहाद्दर ग्रामपंचायत सदस्य शिंदी (बु.) यांची उक्त कलमान्वये अनहर्ता सिद्ध होत असल्याने त्यांना सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. हा आदेश ११ मार्च २०१५ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी पारित करून आज दहा दिवस झालीत. त्या आदेश पत्राची प्रत ग्रा. पं. कार्यालयास मिळाली तरीही ग्रामपंचायत कार्यालयातील कार्यकारिणी फलकावर अपात्र सदस्यांचे नाव कायम असल्याने येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. विशेष म्हणजे या आदेशावर ग्रामपंचायत शिंदी (बु.)चे सचिव यांनी रिक्त पद असल्याचे पत्र पुढील कार्यवाहीकरिता काढल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे. एकीकडे पद रिक्त असल्याचे ग्रामविकास अधिकारी कबूल करतात तर दुसरीकडे फलकावरील अपात्र सदस्यांचे नाव कायम ठेवत असल्याने याविषयी कुठेतरी शंका निर्माण होत असल्याची चर्चा गावात आहे.(तालुका प्रतिनिधी)