शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हाडांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी नागपूर रेफरचे प्रमाण थांबणार

By उज्वल भालेकर | Updated: April 8, 2024 19:33 IST

इर्विन रुग्णालयात ॲडव्हान्स हाय फिक्वेन्सी सी-आर्म मशीन उपलब्ध

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे गुरुवारी ४० ते ४५ लाख रुपये किमतीची ॲडव्हान्स हाय फिक्वेन्सी सी-आर्म मशीन उपलब्ध झाली आहे. ही मशीन ऑपरेशन थिएटरमध्ये इंस्टॉलदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ती रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी पडणार असून, हाडांशी संबंधित जटिल शस्त्रक्रियेसाठी नागपूर रेफरचे प्रमाण आता थांबणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रोज शेकडोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच जिल्ह्यातील अपघातग्रस्तांना सर्वप्रथम उपचारासाठीदेखील इर्विन रुग्णालयातच दाखल केले जाते. त्यामुळे अपघातामध्ये हड्डी मोडलेल्या तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या अनेक रुग्णांना नागपूर रेफर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इर्विनमध्ये शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ॲडव्हान्स उपकरणे नसल्याची ओरड असायची. परंतु, आता रेफरचे प्रमाण थांबणार आहे. इर्विनच्या ऑपरेशन थिएटरमध्ये गुरुवारी ॲडव्हान्स हाय फिक्वेन्सी सी-आर्म मशीन उपलब्ध झाली असून, ती इंस्टाॅलदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या मशीनच्या प्रात्यक्षिक (डेमो)साठी नागपूरहून विशेषतज्ज्ञ येणार आहेत. या प्रात्यक्षिकानंतरच ही मशीन नियमित रुग्णांच्या हाडांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी उपयोगात येणार आहे.शस्त्रक्रियेची जागा स्क्रिनवर पाहता येणारसी आर्म मशीनचा उपयोग हा हाडांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी केला जातो. या मशीनच्या माध्यमातून डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान हाड किंवा शस्त्रक्रियेवरील अंतर्गत जागा स्क्रिनवर पाहता येते. त्यामुळे या मशीनद्वारे किरकोळ ते मोठमोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. शस्त्रक्रियेदरम्यान कोणता स्क्रू, रॉड कुठे टाकायचा आहे, हे या मशीनद्वारे ठरविले जाते.