शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

कोमल सापडली नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:09 IST

शारदानगरातून बेपत्ता झालेली कोमल काकाणी ही १३ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी नागपुरात सापडली. सोशल मीडिया व पोलिसांच्या सजगतेने कोमलचा शोध लागला.

ठळक मुद्देचर्चेला पूर्णविराम : पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शारदानगरातून बेपत्ता झालेली कोमल काकाणी ही १३ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी नागपुरात सापडली. सोशल मीडिया व पोलिसांच्या सजगतेने कोमलचा शोध लागला. तिला राजापेठ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अमरावतीत आणले.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोमल काकाणी रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी शोधकार्य सुरू केले. कोमल बेपत्ता झाल्याची माहिती अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर झळकली. कोमलच्या आई-वडिलांनी राजापेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोधमोहीम राबविली. बसस्थानके, रेल्वेस्थानके आदी ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम राबविली. मात्र, रात्रीपर्यंत तिचा सुगावा लागला नव्हता. कोमलचे छायाचित्रासह माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अमरावती शहरासह राज्यभरात कोमलच्या अपहरणाची चर्चा रंगली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीही तपासाची सूत्रे हलवून राजापेठ पोलिसांना योग्य निर्देश दिलेत. पोलिसांनी कोमलच्या छायाचित्रांची फलके विविध शहरांत लावली. शनिवारी सकाळी कोमल ही नागपुरात असल्याचे कळताच पोलिसांना व तिच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला. राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अनिल मुळे व गोकुल ठाकूर, नरेंद्र ढोबळे, दीपक श्रीवास व महिला पोलीस सारिका यांनी शनिवारी सकाळीच नागपूर गाठून कोमलला ताब्यात घेतले.अशी गवसली कोमलकोमल रागाच्या भरात १९ सप्टेंबरला सायंकाळी घरातून निघून गेली. तिने अमरावती बसस्थानकावरून रात्री ९.४५ वाजताच्या शेगांव-नागपूर बसने नागपूर गाठले. दरम्यान बसमधील पूजा काशीकर व मीना पोरटे या दोघींनी तिला विचारपूस केली. मध्यरात्री एसटी नागपूर बसस्थानकावर पोहोचल्यानंतर कोमल एकटीच असल्याचे पाहून मीना पोरटे यांनी तिला एसटी विभागाचे नियंत्रक वंजारी यांच्या स्वाधीन केले. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने वंजारींनी कोमलला पोरटेच्या स्वाधीन केले. दुसºयाच दिवशी मीना यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याचे निधन झाले. त्यावेळी कोमल ही मीना यांच्यासोबतच होती. शनिवारी सकाळी नियंत्रक वंजारी यांच्या मोबाईलवर कोमल बेपत्ता झाल्याची माहिती व छायाचित्र झळकले. त्यानंतर कोमलचा परतीचा प्रवास सुरू झाला.