शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीदरम्यान माय-लेकीचा मृत्यू , अमरावतीचे डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोव-यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 19:39 IST

तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले.

धारणी : तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा आरोग्य मंडलद्वारा संचालित उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटलमध्ये धारणी येथील अमृता रोमित गुप्ता (२२) या गर्भवतीला काल गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर सर्व रिपोर्ट सामान्य असून, प्रसुती सामान्य होईल, असे आश्वासन उपचार करणारे डॉ. केतकी छाबडा व डॉ. प्रवीण यांनी परिजनांना दिले. 

अमृताला सायंकाळी ६ च्या सुमारास प्रसवकळा सुरू झाल्या. यादरम्यान गर्भातील अर्भकाबाबत शंका येताच प्रसूतीचे प्रयत्न आरंभिले गेले. काही वेळाने नवजात मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर अमृताला रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिचीही स्थिती गंभीर झाल्याचे परिजनांना कळविण्यात आले. उपचाराचे सारे प्रयत्न विफल होऊन मध्यरात्री अमृताने शेवटचा श्वास घेतला.

अमृताचे सर्व अवयव सामान्यपणे काम करीत असताना नवजात व त्यापाठोपाठ प्रसूताचा मृत्यू होण्याची घटना पहिल्यांदाच पहावयास मिळाला. या संस्थेत यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याने या दवाखान्याची चौकशी करणे आवश्यक आहे.- शैलेश जिराफे, होमिओपॅथ, धारणी.

अमृताचे प्रकरण माझ्यासाठी आव्हान होते. मात्र, त्यात अपयश आले. मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोस्टमार्टम करण्याचा सल्ला परिजनांना दिला आहे.- डॉ. केतकी छाबडा, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. सुशिला नायर हॉस्पीटल, उतावली.

यापूर्वीही अनेक गरीब आदिवासी महिलांचे प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची प्रकरणे रुग्णालयात घडली आहेत. मार्च महिन्यात लवादा येथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला होता. सेवाग्राम येथून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची चमू पाठविण्यात येते. या डॉक्टरांना वैद्यकीय अनुभव नसताना ते आपल्या परीने रुग्णांवर बेजबाबदार उपचार करतात. या दवाखान्यात परिजनांना विश्वासात न घेताच व उपचाराची माहिती न देता मोठी रक्कम उकळली जात असल्याची अनेकांची तक्रार आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल