शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

रेड्डी म्हणतात, माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही, वनखात्याला दिले चॅलेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST

राजाच्या अतिरक्त सचिवांच्या जोरावर मुजोरी, मार्च एन्डला बदली रोखण्याची कसरत अमरावती : राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवांच्या जोरावर ...

राजाच्या अतिरक्त सचिवांच्या जोरावर मुजोरी, मार्च एन्डला बदली रोखण्याची कसरत

अमरावती : राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवांच्या जोरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज करणारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी नागपूर येथे मुख्यालयात झालेली बदली रद्द करण्यासाठी राज्याच्या वनखात्याला पत्र लिहून चॅलेंज केले आहे. माझी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नाही. याबाबत पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बदलीला चॅलेंज करणारे रेड्डी हे आयएफएस लॉबीला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटनुसार एम.एस. रेड्डी यांच्यावरही संशयाची सुई वळली आहे. परिणामी राज्याच्या वन मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांची अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेशित केले आहे. परंतु, रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे रेड्डी यांनी २७ मार्च रोजी पत्राद्धारे नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. साईप्रसाद यांना बदलीसंदर्भात पुनर्विचार करावा, असे नमूद केले आहे.

गत पाच वर्षांपासून एम. एस. रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सन २०१७ मध्ये रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकपदी रुजू झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले. आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता राज्यातील अन्य आयएफएस लॉबीला चॅलेंज करून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. बढती झाल्यानंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोह त्यांना दूर करू शकला नाही, हे स्पष्ट होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पद हे राज्यस्तरावरील आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाची परवानगी न घेता मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिवांच्या बळावर अमरावती विभाग स्तरावर हे पद निर्माण करण्याची किमया रेड्डी यांनी केली आहे.

----------------

बदलीला विरोध का?

गत पाच वर्षांपासून एम. एस. रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी भंग केला आहे. केंद्र व राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात वनसंवर्धनाचा फज्जा उडवीत पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी रेड्डी हे बदलीला विरोध करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.