आरोपींना अटक : परतवाड्याच्या कांडली परिसरातील घटना परतवाडा : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यावर लोखंडी पाईप, टामीने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता कांडली परिसरातील तलाठी कार्यालयाजवळील हरितवालनगरात घडली. या घटनेने जुळ्या शहरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी भावंडांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केले. किशोर मोरेश्वर घोटेकार (३०, रा.वनश्री कॉलनी, कांडली), असे मृताचे नाव असून श्रीकांत शंकरराव दुरतकर(२८), शुभम शंकरराव दुरतकर (२१,रा.रामनगर, कांडली) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी किशोरला लोखंडी टामी, पाईपने डोक्यावर बेदम मारहाण करुन पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. परतवाड्यात गुन्हेगारी वाढलीपरतवाडा : स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किशोर व त्याचा भाऊ गजानन घोटेकार दोघेही वेल्डिंगचा व्यवसाय करतात. शुक्रवारी दुपारी १.४५ वाजताच्या दरम्यान किशोर हा या परिसरातील मोबाईल शॉपीमध्ये बसला असता आरोपी श्रीकांत व शुभम दुरतकर तेथे आले. किशोरचे आपल्या बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याचा राग त्यांना होता. त्यावरून त्यांनी किशोरसोबत वाद केला. आणि त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईप, टामीने वार केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. परतवाडा शहराला लागून कांडली ग्रामपंचायतीचा परिसर आहे. येथे सर्वाधिक लोकसंख्या नोकरदारांची आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दिवसाढवळ्या हत्याबहिणीच्या प्रेमप्रकरणातून हत्या केल्याची तक्रार मृताच्या भावाने पोलिसांत केली आहे. मात्र, आरोपींच्या बहिणीची मृत किशोर हा छेड काढत होता की, त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते, याचा खुलासा वृत्त लिहिस्तोवर झालेला नव्हता. (प्रतिनिधी)
बहिणीच्या प्रियकराची हत्या
By admin | Updated: July 2, 2016 00:02 IST