चिखलदरा : तालुक्यातील घटांग येथे गत महिन्यात गळा आवळून खून केलेल्या गर्भवती कुमारिकेची ओळख पटविण्यात आली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली.रेखा केज्या धुर्वे (३०, रा. ब्राह्मणवाडा पाठक, ता. चांदूर बाजार) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणी छोटू ऊर्फ असलम अली अहमद अली (३५. रा. खरपी ता. चांदूर बाजार) याला अटक करण्यात आली. छोटू आणि रेखा यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिला गर्भधारणा झाली. सदर बाळाचा सांभाळ करून आपल्यासोबत राहण्याचा दम रेखाने छोटूला दिला होता. त्यामुळे संतापलेल्या छोटूने गळा आवळून तिचा खून केला. आरोपीने खुनाची कबुली चिखलदरा पोलिसांना दिली. पोलिसांनी यापूर्वीच अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, धारणीचे एसडीपीओ संजय काळे, गुन्हे शाखेचे सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विनायक लंबे, शहाजी रूपनर, युवराज उईके, सुरेश लाखोडे, राजू पुरोहित, ईश्वर जांबेकर, जमादार वर्मा, महिला कर्मचारी नंदनवार, प्रमोद पुरंदरे यांनी ही कारवाई केली.असे फुटले बिंग; भावाने ओळखलेमृताची शोधपत्रिका सर्वत्र पाठविण्यात आली. त्यावरून भाऊ राजेश धुर्वे (रा. खरपी) याने बहिणीला ओळखले. चिखलदरा पोलिसांना त्यासंदर्भात कळविले. पोलिसांच्या चौकशीत छोटू ऊर्फ असलम अली याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
गर्भवती कुमारिकेच्या खून प्रकरणाचा गुंता सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST