शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तारखेड्यात धारदार शस्त्राने तरूणाचा खून; विविध दिशेने तपास, अज्ञाताविरूध्द गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: July 2, 2023 19:35 IST

हाताला येईल ते काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला.

अमरावती: हाताला येईल ते काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. १ जुलै रोजी रात्री १२ ते १२.१५ च्या सुमारास तारखेडा चौकात ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.मनोज हिरालाल सोनी (३०, गणपती मंदिराजवळ, तारखेडा, अमरावती) असे मृताचे नाव आहे.

मनोजच्या खुनाचा गुंता सोडविण्यासाठी खोलापुरी गेट पोलिसांसह गुन्हे शाखा देखील सरसावली आहे. मात्र सायंकाळपर्यंत मनोजच्या खुनामागील कारण स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने सर्व शक्यतांंची पडताळणी करून तपास केला जात आहे. अलिकडे सिसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणारा मनोज विवाहित आहे.

शनिवारी रात्री १२ नंतर त्याच्या घराजवळील मंदिरानिजकच्या चौकात त्याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या पोटावर, छातीवर व हातावर वार करण्यात आल्याने तो तेथेच कोसळला. तो कोसळताच आरोपीने पळ काढला. तर दुसरीकडे मनोजला प्रथम जिल्हा सामान्य रूग्णालयात व पुढे खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्युची वार्ता कळताच भाजीबाजार, तारखेडा परिसरात खळबळ उडाली. खोलापुरी गेट पोलिसांनी दोन तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.प्रेमप्रकरण की विवाहबाह्य संबंध?

मनोजच्या हत्येनंतर पोलिसांनी दोन तीन शक्यतांची पडताळणी करून तपासाला वेग दिला आहे. प्रेमप्रकरण, विवाहबाह्य संबंध व जुने वैमनस्य अशा तीन आघाड्यांवर तपास केला जात आहे. पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनोजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलीस आयुक्तांनी गाठले घटनास्थळ 

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी देखील रविवारी घटनास्थळ गाठले. त्यानंतर खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिशानिर्देश दिलेत. पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड व पुनम पाटील , गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे यांनी देखील खोलापुरी गेट ठाण्यात सकाळपासून ठिय्या दिला. तेथील नवनियुक्त ठाणेदार रमेश ताले पुढील तपास करत आहेत. विशेष पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमलू व त्यांची टिम देखील खोलापुरी गेटमधील त्या खुनाचे धागेदोरे शोधण्यासाठी प्रयत्नशील दिसली.