शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

पथ्रोट येथे वेटरचा खून

By प्रदीप भाकरे | Updated: January 3, 2024 20:22 IST

दांडक्याने डोक्यावर वार करीत खून केल्याची कबुली अटक वेटरने पथ्रोट पोलिसांकडे दिली आहे.

अमरावती : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे महामार्गालगत हॉटेल अतिथी ढाबा अँड रेस्टॉरंटमध्ये वेटरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासादरम्यान हा खून असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी ३ जानेवारी रोजी तेथीलच एका वेटर व कूकला ताब्यात घेण्यात आले. दांडक्याने डोक्यावर वार करीत खून केल्याची कबुली अटक वेटरने पथ्रोट पोलिसांकडे दिली आहे. संदीप ज्ञानेश्वर दामले (४०, रा. वाल्मिकपूर) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. तो याच ढाब्यावर रात्री वास्तव्यास राहत होता. २ जानेवारी रोजी रात्री ढाबामालक मोहन पाटील हे प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. ३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे ढाब्यावर आले असता, त्यांना संदीप दामले हा दृष्टीस पडला नाही. त्याची शोधाशोध केली असता, हॉटेलच्या मागच्या बाजूला रक्ताने माखलेला त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची त्यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिल्यावर ठाणेदार विनायक लंबे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित वेटर अंकुश इंगळे व कूक गणेश सचान यांना त्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

ढाब्यावर गणेश सचान (रा. अमरावती) हा कूक म्हणून कामाला होता. ज्ञानेश्वर दामले हा मागील एक महिन्यापासून, तर त्याच्या दोन दिवसांपूर्वी अंकुश इंगळे (रा. सामदा, ता. दर्यापूर) हे वेटर म्हणून कामाला लागले होते. रात्रीला जेवताना त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी दंडुक्याने डोक्यात वार करून त्याचा मृतदेह हॉटेलच्या मागच्या बाजूला नेऊन टाकल्याची  कबुली अंकुशने दिली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती