अमरावती : नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत कठोरा मार्ग ते अम्मन बोअरवेल मार्गाच्या सुरू असलेल्या कामात अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर केला जात आहे. याबाबत तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी आनंदविहार कॉलनीतील नागरिकांच्यावतीने महापालिका प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी पेटविण्यात आली. कठोरा रोड ते अम्मन बोअरवेल मार्गाच्या कामात निकृष्ट साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याबाबतची तक्रार नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने आमदार सुनील देशमुख यांनी या कामाला भेट देऊन पाहणी केली. मात्र, त्यानंतरही महापालिकेच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने या कामाची दखल घेतली नाही किंवा पाहणीदेखील केली नाही, हे विशेष. अन्यथा आंदोलन छेडणारअमरावती : नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर उपायुक्त अवघड यांनी या कामाची पाहणी करून तातडीने नव्याने गुणवत्तापूर्वक काम करण्याचे आश्वासन दिले. पश्चात महापालिकेचे शहर अभियंता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी या कामाची पाहणी करून काम कसे गुणवत्तापूर्ण आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांची त्यांच्यासोबत बाचाबाचीही झाली. त्यानंतरही काम जैसे थेच राहिले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी महापालिकेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला. यावेळी परिसरातील नागरिक प्रवीण मनोहर, दिनेश ठाकरे, भूषण ठाकरे, सचिन देशमुख, सुरेश बारबुदे, मधुकर भोपाळे, र.बा.गायकवाड, पी.एन.लांडगे, अमोल डहाके, अमोल दांडगे, ओंकार पावडे, आकाश बोरकर, विपिन राूत, नलू निर्भाने, स्वप्नील भागवत आदी उपस्थित होते.
महापालिकेचा पुतळा जाळला
By admin | Updated: March 6, 2015 00:42 IST