शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पालिकेची ५० लाखांची इमारत बनली जुगाऱ्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:19 PM

स्थानिक नगरपालिकेच्या मालकीची विशेष निधी अंतर्गत ५० खर्च करून बांधण्यात आलेली अग्निशमन विभागाची इमारत पाच वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडली आहे.

ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष : काचा फोडून खिडक्या, नळाचे साहित्य चोरीला

आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : स्थानिक नगरपालिकेच्या मालकीची विशेष निधी अंतर्गत ५० खर्च करून बांधण्यात आलेली अग्निशमन विभागाची इमारत पाच वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडली आहे. रात्री जुगार, अश्लील चाळे करणाऱ्यांचा हा अड्डा बनतो. या इमारतीच्या खिडक्यांचे काच फोडून अ‍ॅल्युमिनियम चौकटी लंपास करण्यात आल्या आहेत.मोर्शी-चांदूर बाजार रोडवर अग्निशमन विभागाची इमारत नगरपालिकेने बांधून बेवारस अवस्थेत सोडून दिली आहे. या इमारतीवर ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये कर्मचारी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, वीज आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळे ही इमारत पांढरा हत्ती बनली आहे. ही इमारत बांधकाम झाल्यापासून पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने चोरट्यांनी खिडकीच्या काचा फोडून सर्व अ‍ॅल्युमिनियमच्या चौकटी चोरून नेल्या आहेत तसेच इमारतीच्या स्लॅबवरील २००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मागील बाजूला टाकून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर एक टाकी चोरण्याच्या प्रयत्नात इमारतीवरून खाली पडल्याने जागीच फुटली. ती टाकी इमारतीच्या मागील बाजूला चोरट्यांनी तशीच सोडून दिले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ५० लक्ष रुपये खर्च करून उभी केलेली ही इमारत चोरट्यांचा अड्डा बनली आहे.इमारतीची दुरवस्थाइमारतीतील महागडी पाइप लाइन, खिडक्या, चोरट्याने लंपास केल्या असून, सर्वत्र काचांचा खच पडला आहे. इमारतीत दारूच्या बाटल्या, जुगाराचे साहित्यच नव्हे तर अश्लील साहित्यदेखील पडलेले आढळते.वीज-पाणी सुविधा देणारइमारतीच्या दुरवस्थेकडे पालिकेचे बांधकाम सभापती अतुल रघुवंशी यांचे लक्ष वेधताच, पालिकेच्या अभियंत्यासह अग्निशमन विभागाच्या या इमारतीला भेट देऊन तेथे वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी ठराव घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. .