शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना महापालिकेची नोटीस

By admin | Updated: August 28, 2014 23:29 IST

नवसारीतील महापालिकेच्या भूखंड क्र. ३४ मधील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढण्याचे आदेश देणाऱ्या नोटिशी महापालिकेने बजावल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

अमरावती : नवसारीतील महापालिकेच्या भूखंड क्र. ३४ मधील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढण्याचे आदेश देणाऱ्या नोटिशी महापालिकेने बजावल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पर्यायी जागेची मागणी केली आहे.स्थानिक नवसारी येथील भूखंड क्र. ३४ या जागेवर सुमारे २० वर्षांपासून २५ पेक्षा जास्त गरीब कुटुंब वास्तव्याला आहेत. त्यांनी या जागेवर राहण्यासाठी तात्पपरत्या झोपड्या उभारल्या आहेत. परंतु महापालिकेच्यावतीने त्यांना ११ आॅगस्ट रोजी नोटिीशी बजावण्यात आल्या असून सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यासंदर्भात बजावण्यात आले आहे. स्वत: अतिक्रमण न काढल्यास मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार महापालिका हे अतिक्रमण काढून त्याचा खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येईल, असे या नोटीशीत नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या नागरिकांनी नगरसेवक भूषण बनसोड यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. आहे त्याच ठिकाणी स्थायी स्वरुपात जागा मिळावी किंवा पर्यायी जागेची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नगरसेवक भूषण बनसोड, विठ्ठल डाबेराव, मनोज करहार, कांता करहार, सुधीर गायकवाड, आशा परिहार, भागवतराव हरसुले, राजकुमार कोठार, वर्षा भैसार, बबन नंदेश्वर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)