शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

महापालिकेला अतिक्रमणाची घेराबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:01 IST

अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे.   पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट  फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी,  असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वाराला अतिक्रमणाने घेराबंदी केली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा संपूर्ण फूटपाथ व समोरील जागा अतिक्रमणधारकांनी कह्यात घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सर्वदूर पुन्हा अतिक्रमणाने तोंड वर काढले आहे. शहरातील वर्दळीच्या चौकात अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. त्यावर कळस म्हणजे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयालाही अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाने घेराबंदी केली आहे. उपायुक्त प्रशासन सुरेश पाटील यांनी आपल्या अधिनस्थ विभागाला त्याबाबत निर्देश देऊन अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करावी, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे.शहरातील एकही रस्ता अतिक्रमणापासून अलिप्त नाही. जागोजागी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.  तक्रारी येतील तेवढीच कारवाई करण्याचा पवित्रा  अतिक्रमण विभागाने घेतल्याने अतिक्रमणधारकांचे फावले आहे. अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे.   पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट  फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी,  असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वाराला अतिक्रमणाने घेराबंदी केली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा संपूर्ण फूटपाथ व समोरील जागा अतिक्रमणधारकांनी कह्यात घेतली आहे. महापालिकेचे १५०० अधिकारी, कर्मचारी रोज त्यातूनच मार्ग काढत मुख्यालयात जात असतात.  मुख्यालयासमोरील अतिक्रमण कुणालाही दिसत नाही. राजकमल चौकातील प्रवेशद्वाराजवळ  फुटपाथ व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. पालिकेच्या या अग्रभागाला अनधिकृत पार्किंगने वेढले आहे. आतही चित्र काही वेगळे नाही.

अनेक विक्रेते ठाण मांडूनशाम, जयस्तंभ, राजापेठ, नवाथे, राजकमल, अंबादेवी मार्ग  अशा बऱ्याच गजबजलेल्या चौकात अनेक हातगाड्या पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उभ्या आहेत.  बसडेपोकडून रुक्मिणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळी अनेक हातगाड्या लागतात. त्याला कुणाचा आशीर्वाद आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे यातील काही हातगाड्यांजवळ दारू रिचविली जाते. सायंकाळी ६/७ नंतर रुक्मिणीनगरकडून बसडेपोकडे जाणारा मार्ग अघोषित आणि अनधिकृत फूड झोन बनला आहे.

रस्ते कशासाठी? सारे फूटपाथ आणि रस्ते अतिक्रमण करणाऱ्यांसाठीच आहेत काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. फूटपाथवर खाद्यपदार्थांच्या अनेक हातगाड्या नित्यनेमाने आणि दाटीवाटीने लावल्या जातात.   पार्किंगच्या जागांचा गैरवापर झाल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. गाळेधारकांनी रस्त्यावर छत घातल्याने सारे रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाने शहराची अवस्था बकाल झाली आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण