लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात मोकाट जनावरांचा ठिय्या कायम असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत उपाययोजनांसंदर्भात पालकमंत्र्यांनी महापालिकेला निर्देश दिले होते. मात्र, दोनच दिवस कार्यवाही झाल्यानंतर पशूंचा ठिय्या ‘जैसे थे’ आहे.शहरातील मालटेकडी परिसरातील पोलीस पेट्रोल पंप ते कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर नित्याने मोकाट गुरांचा ठिय्या दृष्टीस पडतो. येथे भरधाव ये-जा करणाºया वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. शाळकरी मुले सायकल, दुचाकी वाहनांनी येथून ये-जा करतात. त्यांनादेखील अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी या समस्येवर उपयायोजना करण्यासंबंधी महापालिका आयुक्तांना मागील महिन्यात बैठकीदरम्यान निर्देश दिले होते.पुनरावृत्तीची भीतीतत्कालीन महापौर दीपाली गवळी यांचा मुलगा मोकाट गोºह्याने उचलून फेकल्याने मरण पावला होता. मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास सदर घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.महापालिका पशुवैद्यकीय विभागाद्वारे मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस बजावली असतानाही मोकाट गुरांचा ठिय्या कायम दृष्टीस पडत असल्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आमची कार्यवाही निरंतर सुरू आहे.- सचिन बोंद्रे, पशुवैद्यकीय अधिकारी
पालकमंत्र्यांच्या निर्देशाला महापालिकेचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:01 IST
शहरातील मालटेकडी परिसरातील पोलीस पेट्रोल पंप ते कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर नित्याने मोकाट गुरांचा ठिय्या दृष्टीस पडतो. येथे भरधाव ये-जा करणाºया वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. शाळकरी मुले सायकल, दुचाकी वाहनांनी येथून ये-जा करतात.
पालकमंत्र्यांच्या निर्देशाला महापालिकेचा खो
ठळक मुद्देशाळकरी विद्यार्थ्यांना धोका। वर्दळीच्या मार्गांवर मोकाट जनावरांचा ठिय्या कायम