शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन’ खरेदीचा मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

चौकशी अहवालात तत्कालीन उपआयुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, तत्कालीन अग्निशामन अधीक्षक भरतसिंह चौहान यांच्यावर ठपका ठेवला आहे. या प्रस्तावाला अंतिम मान्यता ही तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. त्यांना ही खरेदी थांबविता आली असती.

ठळक मुद्देचौकशी अहवाल सभागृहात मंजूर : तत्कालीन आयुक्त हेमंत पवारांवर एफआयआर नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सेवानिवृत्त न्यायाधीश जी.एम. कुबडे यांनी मल्टियुटिलिटी रेस्क्यू व्हॅन खरेदी प्रकरणाचा चौकशी अहवाल महापालिकेला सादर केला होता. सदर चौकशी अहवालावर शुक्रवारी महापालिकेच्या आमसभेत चर्चा घडून आली. व्हॅन खरेदीच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता ही तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनीच दिली. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जावा तसेच महापालिकेची फसवणूक करणाऱ्या निधी एन्टरप्राइजेसला काळ्या यादीत टाकून संबधीतांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहात लावून धरली. सभागृहासमोर ठेवलेला चौकशी अहवाल पीठासीन सभापती संजय नरवणे यांनी स्वीकारला.चौकशी अहवालात तत्कालीन उपआयुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, तत्कालीन अग्निशामन अधीक्षक भरतसिंह चौहान यांच्यावर ठपका ठेवला आहे. या प्रस्तावाला अंतिम मान्यता ही तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. त्यांना ही खरेदी थांबविता आली असती. मात्र, त्यांनी दोन दिवसांतच देयके अदा केल्याचा नगरसेवकांचा सूर होता.आचारसंहितेपूर्वीच्या आमसेभेवर सर्वांचे लक्ष लागले होते. नगरसेवक धीरज हिवसे यांनी तत्कालीन आयुक्त हेमंत पवार हे पहिल्या क्रमांकाचे दोषी ठरतात; त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे, अन्यथा महापालिकेत उपोेषण करू, असा इशारा दिला.नेमकी काय अनियमितता झाली आणि दोषी कोण, यावर चर्चा व्हावी, असे मत नगरसेवक विलास इंगोले यांनी मांडले. त्यावेळी स्थायी सभापती कोण होते, हेही स्पष्ट करण्याची काही नगरसेवकांची मागणी होती. अजय गोंडाणे, प्रशांत वानखडे, नीलिमा काळे, बबलू शेखावत, सुनील काळे, दिनेश बूब, प्रणय कुलकर्णी यांनी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. दोन कोटींचे वाहन आता ५० लाखांतही कुणी खरेदी करणार नसल्याचे बबलू शेखावत म्हणाले. अभ्यासपूर्ण चौकशी अहवालाचे कौतुक करीत मिलिंद चिमोटे यांनी ९२ नगरसेवकांचे सभागृह म्हणजे एक न्यायालयच असून, या प्रकरणात सावधगिरीने कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा, असे सांगितले. दोन्ही बाजू तपासल्याशिवाय सभागृहाने निर्णय दिल्यास व त्याविरोधात कुणी न्यायालयात गेले, तर तो निर्णय कोर्टात टिकणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी पीठासीन सभापती तथा महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त संजय निपाणे, प्रभारी नगर सचिव नरेंद्र वानखडे यांची उपस्थित होेती.महापालिका प्रवेशद्वारावर शिवसैनिकांची घोषणाबाजीमल्टियूटिलिटी वाहन खरेदीचा चौकशी अहवाल शुक्रवारच्या आमसभेत चर्चेसाठी ठेवण्यात आल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक प्रदीप बाजड यांना कळविले होते. मात्र, सकाळीच शिवसैनिकांनी प्रवेशद्वारापुढे कारवाईच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. हा मुद्दा आमसभेसमोर चर्चेला आल्याने आंदोलन करू नये, सभागृहातील निर्णयानुसार कारवाई होईल, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी प्रदीप बाजडसह संजय शेटे, दीपक लोखंडे, प्रमोद देशमुख, दिलीप काकडे, रवि कदम, दिलीप देवतळे यांनी घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.किती विहिरींमधील गाळ काढला?विहिरींमधील गाळ काढण्यासाठी मल्टियूटिलिटी रेस्क्यू व्हॅन खरेदी करण्यात आली. ८० ते ९० लाखांना मिळणारी मशीन महापालिकेने २ कोटी ४ लाखांना घेतली. या मशीनचा उपयोग काय झाला व किती विहीरी स्वच्छ झाल्या, असा सवाल नगरसेवक बंडू हिवसे यांनी सभागृहात विचारला.