शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

कोट्यवधींची उलाढाल करणारा पोळा बाजार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

पंचक्रोशीत शेंदूरजना घाट येथील पोळा बाजार प्रसिद्ध आहे. या पोळा बाजारात अवघ्या ३६ तासांत कोट्यवधींची उलाढाल होते. फर्निचरपासून गृहपयोगी, शेतीविषयक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सर्वांत मोठी उलाढाल ही फर्निचर बजारात होत असते. सोफा, दिवाण, कपाट, टेबल, खुर्च्या या लाकडी तसेच फायबर वस्तूंची रेलचेल असते. कुऱ्हाड, विळा, डवरे, वखराची पास, खुरपी, सब्बल आदी वस्तू शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तव्यापासून सर्वच गृहपयोगी वस्तू या बाजारात सहज उपलब्ध होतात.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : व्यावसायिक अडचणीत, शेंदूरजनाघाट सुनेसुने

लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : येथील पोळ्याच्या बाजारावर यंदा कोरोनाचे संकट कोसळले आहे. त्यामुळे कारागिरांना साहित्य विक्री व ग्राहकांना खरेदीचे समाधान देणारा शेंंदूरजना येथील हा बाजार यंदा होणार नाही.पंचक्रोशीत शेंदूरजना घाट येथील पोळा बाजार प्रसिद्ध आहे. या पोळा बाजारात अवघ्या ३६ तासांत कोट्यवधींची उलाढाल होते. फर्निचरपासून गृहपयोगी, शेतीविषयक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सर्वांत मोठी उलाढाल ही फर्निचर बजारात होत असते. सोफा, दिवाण, कपाट, टेबल, खुर्च्या या लाकडी तसेच फायबर वस्तूंची रेलचेल असते. कुऱ्हाड, विळा, डवरे, वखराची पास, खुरपी, सब्बल आदी वस्तू शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तव्यापासून सर्वच गृहपयोगी वस्तू या बाजारात सहज उपलब्ध होतात. लहान मुलांच्या खेळण्यापासून तरुणींच्या सौंदर्य प्रसाधनापर्यंत सर्व गोष्टी सहज मिळतात.पोळ्याच्या आदल्या दिवशी लागणाऱ्या दुकानांमधून २४ तास एकच गर्दी असते. रात्री २ पर्यंत हा बाजार सुरू असतो. या बाजारासाठी अमरावती, नागपूर, वर्धा तसेच मध्य प्रदेशातून दुकानदार माल विक्रीस आणतो. ते या बाजाराची वाट बघतात. बाजारात विक्रीस येणाºया मालाची निर्मिती बरेच दिवसांपूर्वी सुरू होते. पोळा बाजारातून माल खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करतात. यावर्षी संत्र कलमांना चांगला भाव मिळाल्याने खरेदी वाढली असती. परंतु, कोरोनाचे संकट या बाजारावरही कोसळले.नगरपालिकेने काढली नोटीसशेंदूरजनाघाट येथे ३१ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे नगर परिषदेने यावर्षी पोळा बाजार भरणार नसल्याचे नोटीस काढली आहे. याशिवाय जमावबंदीचा आदेश काढला असून, पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एका ठिकाणी एकत्र येऊ नये, असे बजावले आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता, नागरिकांनी सहकार्य करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले. वर्षानुवर्षाची परंपरा असलेला पोळा बाजार यावर्षी भरणार नसल्याने कारागिरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. बाजारातून विशेष खरेदी करण्याची संधी यावर्षी ग्राहकांना मिळणार नाही.

टॅग्स :Marketबाजार