शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मुक्तागिरी चलो रे... मुक्तागिरी’, जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरीवर पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 20:00 IST

श्री. दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरीवर पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म बनविण्यात आली आहे. मुक्तागिरीच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे.

- अनिल कडू

परतवाडा : श्री. दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरीवर पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म बनविण्यात आली आहे. मुक्तागिरीच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे.या डॉक्युमेन्ट्री फिल्ममध्ये ‘मुक्तागिरी चलो रे... मुक्तागिरी’ हे गीत सुप्रसिद्ध गायिका श्रीमती दीपा उदित नारायण यांनी गायिले आहे. टीव्ही सिरीज ‘महाभारत’ला आवाज देणारे आवाजकार हरीश भिमानी यांनी या डॉक्युमेंट्रीला आपला आवाज दिला आहे. हरीश भिमानी राष्ट्रीय पातळीवरील आवाजकार असून त्यांना २०१६ चा नॅशनल फिल्म अवार्डही मिळाला आहे. या डॉक्युमेंट्री फिल्मवर मुंबई-गोरेगाव येथील स्टुडिओत संस्कार करण्यात आले आहेत. ३५ मिनिटाच्या या फिल्मला मुंबईचे महेश दुबे आणि अक्ष्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. सूत्रसंचलन सुद्धा यांनीच केले आहे. पुणे येथील श्रीमती शुभाली शांतीकुमार शहा आणि परिवार यांच्याकडून या फिल्मला मदत लाभली आहे.ही डॉक्युमेंट्री फिल्म मुक्तागिरी येथील डॉक्युमेंट्री हॉलमध्ये दर दोन तासांनी जैन तीर्थयात्री, पर्यटक आणि शालेय विद्यार्थ्यांना व उपस्थिताना दाखविण्यात येणार आहे. फिल्मचे सर्व अधिकार श्री दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ट्रस्ट कमेटीकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.मुक्तागिरी येथील नैसर्गिक सौंदर्य, मंदिरांची रचना व अति प्राचिनता, मूर्ती शिल्प, भगवान पार्श्वनाथ, सातपुडा पर्वत श्रृंखला, जैन धर्म व तत्त्वज्ञान, धार्मिक विधी, उत्सव-पर्व यासह सिद्धक्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये समाविष्ट आहे. संपूर्ण भारतातून जैन तीर्थयात्रेकरू व पर्यटक मुक्तागिरी येथे येतात. दरवर्षी दोनशे ते चारशे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली मुक्तागिरी येथे येतात. मुक्तागिरी या सर्वांचे आकर्षण, देशपातळीवर प्रचार व प्रसारासह येणा-या प्रत्येकाला मुक्तागिरीविषयी, जैन धर्म आणि तत्त्वज्ञान याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने ही डॉक्युमेंट्री फिल्म बनविण्यात आली आहे.परतवाडा शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील मुक्तागिरी सिद्धक्षेत्र मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यांतर्गत भैसदेही तालुक्यात येते. येथील सातपुडा पर्वताच्या शिखरावरील ५२ मंदिरांपैकी काही मंदिरात जाण्यास दीड-दोन वर्षांपासून अडचणी येत होत्या. शिखरावरील पर्वताच्या कडा, दगड कोसळत होते. यावर उपाय करण्याकरिता रॉक फॉल प्रोटेक्शन वॉलकरिता मध्यप्रदेश सरकारने तीन कोटी रूपयांचा निधी दिला. या निधीतून रॉक फॉल प्रोटेक्शनची कामे झाली आहेत. पहाडाचा कडा कोसळू नये, पर्यटकांसह यात्रेकरूंना इजा पोहचू नये, याकरिता पहाडाला लोखंडी जाळ्या लावल्या आहेत.मुक्तागिरीवरील या पहिल्या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचा सहकलाकार म्हणून सहभाग आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस उपायुक्त निवा जैन, अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शुभाली शहा यांच्या हस्ते डॉक्युमेंट्री फिल्मचे उद्घाटन रविवार, ७ आॅक्टोबरला मुक्तागिरी येथे होत आहे. फिल्मचे दिग्दर्शक व अँकर महेश दुबे आणि अक्ष्मा ही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

मुक्तागिरीवरील ही पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म आहे. जैन धर्म आणि तत्वज्ञानासह सिद्धक्षेत्राची माहिती येणा-या प्रत्येकाला मिळावी या उद्देशाने ही डॉक्युमेंट्री बनविण्यात आली आहे.- अतुल कळमकरट्रस्टी, श्री दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र, मुक्तागिरी

टॅग्स :Amravatiअमरावती